टुडे पान एक मेन
---
NSK26H34878/NSK26H34877
खटवानी ः भाविकांसमोर विचार व्यक्त करताना आदिवासी विकासमंत्री अशोक उईके, माजी खासदार डॉ. हीना गावित.
NSK26H34880
खटवानी : व्यासपीठावर उपस्थित आमदार राजेश पाडवी, आमदार आमश्या पाडवी, आदिवासी विकास विभागाचे अपर आयुक्त दिनकर पावरा, जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी, पोलिस अधीक्षक अश्विनी सानप, प्रकल्प अधिकारी डॉ. चंद्रकांत पवार आदी.
NSK26H34883/ NSK26H34881
खटवानी : संत श्री गोविंददास महाराज यांच्या उपस्थितीत काढण्यात आलेली मिरवणूक. दुसऱ्या छायाछिात कायर्कमास उपस्थित भाविक.
---
आदिवासी समाजाच्या इतिहासाचे लेखी दस्तऐवजीकरण
डॉ. अशोक उईके : श्री भाथीजी महाराज जयंती महोत्सव उत्साहात
सकाळ वृत्तसेवा
नंदुरबार/ वाण्याविहीर, ता. १२ : आदिवासी समाजाचा इतिहास, संस्कृती, परंपरा आणि महापुरुषांचे योगदान लेखी स्वरूपात जतन करून ते पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविणे आवश्यक आहे. यासाठी आदिवासी विकास विभाग पुढाकार घेईल, असे प्रतिपादन आदिवासी विकासमंत्री डॉ. अशोक उईके यांनी केले.
अक्कलकुवा तालुक्यातील खटवाणी येथे वाडीधाम (गुजरात) प्रेरित श्री भाथीजी महाराज यांचा ५७ वा प्रगत जन्म जयंती महोत्सव (एकम महोत्सव) भाविकांच्या उपस्थितीत झाला. या वेळी आमदार राजेश पाडवी, आमदार आमश्या पाडवी, माजी मंत्री पद्माकर वळवी, आदिवासी विकास विभागाचे अपर आयुक्त दिनकर पावरा, जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी, पोलिस अधीक्षक अश्विनी सानप, प्रकल्प अधिकारी डॉ. चंद्रकांत पवार, माजी खासदार डॉ. हीना गावित आदी उपस्थित होते.
मंत्री डॉ. उईके म्हणाले, की आदिवासी समाजाचा इतिहास केवळ मौखिक स्वरूपात न राहता त्याचे लेखी दस्तऐवजीकरण होणे आवश्यक आहे. यासाठी पुस्तके प्रकाशित करणे, विविध ठिकाणी साहित्याचे स्टॉल उभारणे, तसेच समाजाच्या सांस्कृतिक कार्याची लेखी स्वरूपात नोंद जतन करणे गरजेचे आहे. या कार्यासाठी आदिवासी विकास विभाग पुढाकार घेऊन आवश्यक ते सहकार्य करेल.
व्यसनमुक्तीसाठी संत श्री गोविंददास महाराज यांचे कार्य उल्लेखनीय आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेण्यात येईल. व्यसनमुक्तीसाठी शासन, प्रशासन आणि सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या संस्थांनी एकत्रितपणे काम करावे, असे आवाहनही मंत्री उईके यांनी केले. यानिमित्त परमपूज्य संत श्री गोविंददासजी महाराज यांची भाविकांच्या उपस्थितीत स्वागत यात्रा काढण्यात आली. या महोत्सवासाठी महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि गुजरात या तीन राज्यांतील भाविक उपस्थित होते. उत्सव उत्साहात व सुरळीतपणे पार पाडण्यासाठी विविध समित्यांची नियुक्ती करण्यात आली होती. या वेळी नियोजन समितीचे प्रमुख, माजी जिल्हा परिषद सदस्य नागेश पाडवी, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रताप वसावे, जगदीश वसावे, पोलिसपाटील संदीप पाडवी, मंगलसिंग वळवी, मधुकर पाडवी, किरण पाडवी, माजी सभापती नटवर पाडवी, कुवरसिंग पाडवी, विनोद वळवी, नानसिंग वळवी आदी उपस्थित होते.
---
चौकट
परंपरा टिकविण्यासाठी प्रयत्न हवेत : डॉ. गावित
या वेळी माजी खासदार डॉ. हीना गावित म्हणाल्या, की आदिवासी बोलीभाषा, संस्कृती, परंपरा, इतिहास टिकविण्यासाठी तसेच व्यसनमुक्त चळवळ राबविण्यासाठी एकत्रित प्रयत्नांची गरज आहे. आदिवासी समाजाचा इतिहास, संस्कृती, परंपरा पुढे नेणे आजच्या नवतरुणांच्या हाती आहे. म्हणून त्यांनी आपले आचरण, पेहराव, बोलीभाषा या माध्यमातून आदिवासींचे अस्तित्व टिकवून ठेवावे. एकम महोत्सवानिमित्त परमपूज्य संत श्री गोविंददासजी महाराज यांची भाविकांच्या उपस्थितीत काढण्यात आलेल्या स्वागत यात्रेत डॉ. हीना गावित यांनी सहभाग घेतला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.