नाशिक

जनजातीय गौरव सेवा सप्ताहानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन

CD
(टुडे पान एक अँकर) फोटो : NSK26H34863 नंदुरबार : पत्रकार परिषदेस उपस्थित जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी. शेजारी निवासी उपजिल्हाधिकारी आशा संघवी, प्रकल्प अधिकारी डॉ. चंद्रकांत पवार. --- जनजातीय गौरव सेवा सप्ताहानिमित्त विविध उपक्रम जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी यांची पत्रकार परिषदेत माहिती सकाळ वृत्तसेवा नंदुरबार, ता. १२ : क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त नंदुरबार व तळोदा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यांच्या कार्यक्षेत्रात १८ नोव्हेंबरपर्यंत जनजातीय गौरव सेवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. आदिवासी बांधवांना शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांचा लाभ देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी यांनी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी निवासी उपजिल्हाधिकारी आशा संघवी, नंदुरबार एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी डॉ. चंद्रकांत पवार, सहायक प्रकल्प अधिकारी देवेंद्र पाटील उपस्थित होते. जिल्हाधिकारी डॉ. सेठी म्हणाल्या, की भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त १५ नोव्हेंबरला ‘जनजातीय गौरव दिन’ जिल्हाभरात साजरा करण्यात येणार आहे. आदिवासी बांधवांसाठी विविध विशेष उपक्रम राबविण्यात येणार आहेत. यात उत्कृष्ट काम करणाऱ्या गावांचा गौरव करण्यात येणार आहे. सिकलसेल रुग्णांसाठी विशेष शिबिर, तसेच जन्मदाखल्याअभावी आधार नोंदणी व अद्ययावतीकरण करताना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. शहादा येथे आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिर घेण्यात येणार आहे. गुणवंत विद्यार्थी आणि उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सत्कार करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील आदिवासी महापुरुषांची स्मारके, सार्वजनिक ठिकाणी स्थापित पुतळ्यांची स्वच्छता केली जाईल. स्मारकस्थळी दीपोत्सव आयोजित केला जाईल. आदिवासी अस्मितेबाबत जनजागृती करण्यात येणार आहेत. या कार्यक्रमांसाठी तालुका समन्वय अधिकाऱ्यांच्या समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम रविवारी (ता. १५) जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत मुख्य शासकीय कार्यक्रमात भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात येईल. आदिवासी महिला बचत गटांना प्रत्येकी १० हजार अर्थसाहाय्य वितरित करण्यात येणार आहे. २०२५-२६ मधील राणी दुर्गावती महिला सक्षमीकरण योजनेंतर्गत एका पात्र महिला बचत गटास सात लाख ५० हजार अर्थसाहाय्य देण्यात येणार आहे. आदिवासी कलाकारांचा गौरव करून पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. आदिवासी वैदू-भगत यांना प्रमाणपत्र व पारितोषिके देण्यात येतील. वनपट्टेधारक शेतकऱ्यांना सातबारा व ८-अ उताऱ्यांचे वितरण करण्यात येईल. उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मुख्याध्यापकांचा गौरव करण्यात येईल. विशेष सेवा शिबिर सोमवारी (ता. १६) नागरिकांना विविध शासकीय सेवा व दाखले सुलभतेने उपलब्ध करून देण्यासाठी नंदुरबार, नवापूर, शहादा, तळोदा, अक्कलकुवा व धडगाव तालुक्यांतील पालिका, नगरपरिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत स्तरावर विशेष सेवा शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत. मंगळवारी (ता. १७) आरोग्य तपासणी व जनजागृती शिबिर, बुधवारी (ता. १८) सप्ताहाच्या समारोपाच्या दिवशी कार्यक्रमांचा आढावा घेण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Novaya Gazeta: ६ पत्रकारांची हत्या, ३३ वर्षांचा संघर्ष; रशियातील शेवटचे मोठे स्वतंत्र वृत्तपत्रही बंद

विनयभंगानंतर तरुणीला लोकलखाली ढकलल्याचा आरोप; नायगाव स्थानकातील धक्कादायक घटना|Naigaon | Mumbai news

Latest Marathi News Live Update : मुंबई महापालिकेच्या नव्या सभागृह उभारणीच्या प्रस्तावावर आज स्थायी समितीत निर्णय होण्याची शक्यता

IND vs NZ 4th ODI: ऋतुराज गायकवाड-रोहित शर्मा सलामीला, इशान पाचव्या स्थानावर; सामना संपताच वेगवान गोलंदाज वन डे टीम सोडून जाणार, नेमकं काय कारण?

Arvind Kejriwal Death Threat: अरविंद केजरीवाल यांना जीवे मारण्याची धमकी; लॉरेन्स बिश्नोई गँगच्या नावाने मागितली ७ कोटींची खंडणी

SCROLL FOR NEXT