विवेक पंडित घेणार आदिवासी योजनांचा आढावा
इगतपुरी तहसीलदार कार्यालयात आज बैठक
सकाळ वृत्तसेवा
घोटी, ता. ४ : आदिवासी विकासासाठी शासनाकडून कोट्यवधींचा निधी खर्च होत असतानाही इगतपुरी तालुक्यातील आदिम कातकरी व आदिवासी बांधव मूलभूत सुविधांपासून वंचित आहे. याबाबत आदिवासी आढावा कृती समितीचे अध्यक्ष तथा राज्यमंत्री दर्जाचे विवेक पंडित सोमवारी (ता. ५) तालुक्यातील आदिवासी योजनांचा आढावा घेणार आहेत.
पंडित खंबाळे येथील वाघ्याची वाडी कातकरी वस्तीलाही भेट देणार असून, त्यानंतर तहसीलदार कार्यालयात आढावा बैठक होणार आहे. ४९९ कुटुंबीयांना घरकुल मंजूर असूनही जागेवर नाव नसल्याने बांधकाम रखडले आहे. २४५ कुटुंबीयांना घरकुल मंजूर झालेले नाही. तसेच ११८ घरकुल मजुरांची मजुरी थकीत आहे. तालुक्यात ३५० कुटुंबांकडे शिधापत्रिका नाही. चार आदिवासी वस्त्यांमध्ये वीज, ११ वस्त्यांना रस्ते, तर सहा वस्त्यांमध्ये अंगणवाडी नाही. याशिवाय २०० वनदावे अपात्र, २६८ कुटुंबे न्यूक्लियस बजेटच्या लाभापासून वंचित, २२२ कुटुंबे स्थलांतरित आणि ३४ विद्यार्थी शाळाबाह्य असल्याची माहिती आहे. ६४ मुक्त वेठबिगारांचाही प्रश्न कायम आहे.
दर महिन्याला आदिवासी विकास विभागाच्या आयुक्तांसमोर आढावा होत असतानाही हे प्रश्न अनुत्तरित का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. ५ ऑक्टोबरच्या बैठकीत प्रत्यक्ष अंमलबजावणीची जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी आदिवासी बांधवांकडून होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.