नाशिक

सेवा संकल्प अभियानातून आश्रमशाळांची शैक्षणिक गुणवत्ता व प्रशासकीय कार्यक्षमता वाढविण्यावर भर!

CD
पान दोन ॲंकर --------------- 09900 कळवण : सेवा संकल्प अभियानांतर्गत आयोजित कार्यशाळेत मार्गदर्शन करताना डॉ. काश्मिरा संखे. समवेत व्यासपीठावरील मान्यवर आश्रमशाळांची शैक्षणिक गुणवत्ता, प्रशासकीय कार्यक्षमता वाढवा डॉ. कश्‍मिरा संखे : कळवणला मुख्याध्यापक, अधीक्षक, गृहपालांसाठी कार्यशाळा सकाळ वृत्तसेवा कळवण,ता.१७ : आदिवासी विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण, उत्तम आरोग्य सुविधा आणि सक्षम प्रशासकीय व्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी आश्रमशाळांमधील शैक्षणिक गुणवत्ता व प्रशासकीय कार्यक्षमता वाढविणे आवश्यक आहे. अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपली जबाबदारी अधिक सक्षमपणे पार पाडत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य द्यावे, असे आवाहन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या प्रकल्प अधिकारी तथा साहाय्यक जिल्हाधिकारी डॉ. काश्मिरा संखे यांनी केले. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, कळवण अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या सेवा संकल्प अभियानांतर्गत मंगळवारी (ता. १७) प्रकल्प कार्यालयात शासकीय व अनुदानित आश्रमशाळांचे मुख्याध्यापक, अधीक्षक, स्त्री अधीक्षक तसेच शासकीय आदिवासी मुला-मुलींच्या वसतिगृहांचे गृहपाल यांच्यासाठी विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत डॉ. संखे यांनी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी साहाय्यक प्रकल्प अधिकारी नितांत कांबळे, निम्स हॉस्पिटलचे संचालक डॉ. मुक्तेश दौंड, डॉ. विजय बिडकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. निंबा कोठावदे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यशाळेदरम्यान आदिवासी विकास विभागांतर्गत शैक्षणिक व प्रशासकीय कामकाजाशी संबंधित विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. आश्रमशाळा व वसतिगृहांमधील दैनंदिन व्यवस्थापन, विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या सुविधा, आरोग्यविषयक काळजी, शैक्षणिक गुणवत्ता तसेच प्रशासकीय कामकाजातील अडचणी यावर विचारविनिमय करण्यात आला. संबंधित अडचणींचे निराकरण करण्यासह कामकाजात सुसूत्रता आणण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन करण्यात आले. सेवा संकल्प अभियानाच्या माध्यमातून शासकीय यंत्रणेतील कार्यपद्धती अधिक गतिमान व परिणामकारक करण्याबरोबरच विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शैक्षणिक वातावरण मिळावे, आरोग्यविषयक सुविधांबाबत जागरूकता निर्माण व्हावी आणि अधिकारी-कर्मचाऱ्यांमध्ये कर्तव्याप्रती उत्तरदायित्वाची भावना वाढावी, हा कार्यशाळेचा मुख्य उद्देश होता. या कार्यशाळेला प्रकल्पांतर्गत येणाऱ्या शासकीय व अनुदानित आश्रमशाळांचे मुख्याध्यापक, शासकीय मुला-मुलींच्या वसतिगृहांचे अधीक्षक, स्त्री अधीक्षक, गृहपाल तसेच विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Cyclone Akvan Update: 145 किमी प्रतितास वेगाने धडकणार चक्रीवादळ ‘अकवान’; 'या' 13 जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज

IPL 2027: शमी चा संघ बदलला! लखनौ-राजस्थान मध्ये मोठी ट्रेड, कोणासोबत झाली अदला बदली

MS Dhoni Retire: महेंद्रसिंग धोनीने त्याचा निवृत्तीचा निर्णय CSK ला केव्हा आणि कसा कळवला? म्हणाला, माझं नाव त्यात लिहा...

School Admission: मोठी बातमी! नर्सरी-केजी प्रवेशावेळी डोनेशन मागितल्यास शाळांवर कारवाई; मुलाखती अन् चाचण्याही बंद; वाचा नवे नियम

Amazon: ॲमेझॉनची भारतात 7 अब्ज डॉलरच्या गुंतवणुकीची योजना; 2030 पर्यंत चार सौर आणि पवनऊर्जा प्रकल्प उभारणार

SCROLL FOR NEXT