नाशिक

आदिवासी विद्यार्थ्यांची नाशिकला रवानगी

CD
मुंबईत दोन दिवसाच्या संघर्षानंतर आदिवासी विद्यार्थ्यांची नाशिकला रवानगी आंदोलनाला भाजप सरकार घाबरल्याची काँग्रेसची टीका सकाळ वृत्तसेवा मुंबई, ता. ६ : विविध मागण्यांसाठी गेल्या ४८ दिवसांपासून आंदोलन करणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची मंगळवारी सांगता झाली. आझाद मैदानावर आंदोलन करण्यास परवानगी नाकारून भाजप सरकारने विद्यार्थ्यांवर अन्याय केला. तसेच पोलिसांच्या माध्यमातून त्यांची मुस्कटदाबी करण्यात आल्याचा आरोप काँग्रेसने केला. नाशिकहून राजभवनावर धडक देण्यासाठी हे विद्यार्थी पायी मुंबईत दाखल झाले होते. त्यांच्या राहण्याची व्यवस्था नसल्याने काँग्रेसने दादर येथील टिळक भवन तसेच पालिकेपुढील काँग्रेस कार्यालयात त्यांच्या तात्पुरत्या मुक्कामाची व्यवस्था केली होती. मात्र, आंदोलनास पोलिसांनी परवानगी नाकारली. त्यानंतर सोमवारी मध्यरात्री पोलिसांनी या दोन्ही कार्यालयांतून विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले. राज्यपालांची भेट घेण्याची विद्यार्थ्यांची मागणी होती. मात्र, विद्यार्थ्यांना समजावून सांगून त्यांना धुळे, नाशिक आणि नंदुरबारपर्यंत सोडून देण्याची तयारी पोलिसांनी दर्शविली. दरम्यान, विद्यार्थ्यांच्या धरपकडीवर काँग्रेस नेत्यांनी तीव्र आक्षेप घेतल्यानंतर त्यांना सोडण्यात आले. दोन दिवस पोलिसांचा वेढा टिळक भवन परिसरात दोन दिवस पोलिसांचा मोठा बंदोबस्त होता. सकाळपासून विद्यार्थी आणि पोलिसांमध्ये आंदोलन मागे घेण्याबाबत चर्चा सुरू होती. टिळक भवनाबाहेर पडताच विद्यार्थ्यांना अटक करण्याची पोलिसांची भूमिका असल्याचे काँग्रेसकडून सांगण्यात आले. अखेर समन्वयातून तोडगा काढण्यात आला आणि विद्यार्थ्यांनी घरी जाण्याची तयारी दर्शविली. काँग्रेस कार्यालयात विद्यार्थ्यांच्या नाश्ता आणि जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. पायी चालत मुंबईत आल्याने अनेक विद्यार्थी अशक्त झाले होते, तर काहींची प्रकृतीही बिघडली होती. त्यांच्या उपचाराची व्यवस्थाही करण्यात आली. पोलिसांनी जवळपास दहा प्रवासी बसची व्यवस्था करून विद्यार्थ्यांना मुंबईबाहेर नव्हे, तर त्यांच्या शहरापर्यंत सोडण्याची तयारी दर्शविली. दुपारी सर्व विद्यार्थी बसने रवाना झाले. आश्रमशाळांतील मृत्यूंच्या चौकशीची मागणी मागील दोन वर्षांत आश्रमशाळांमधील ६०० विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याचा दावा विद्यार्थ्यांनी केला असून, या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली. आदिवासी विकासमंत्र्यांचा राजीनामा घ्यावा, आदिवासी आयुक्तांची बदली करावी, आश्रमशाळांमध्ये मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, तसेच सेंट्रल किचनमधून पुरविण्यात येणाऱ्या भोजनाचा दर्जा सुधारावा, अशा त्यांच्या प्रमुख मागण्या आहेत. ‘आमच्या मुला-मुलींना पोलिसांकडून त्रास दिला जात आहे. आझाद मैदानावर आंदोलन करण्यास परवानगी द्यावी किंवा राज्यपालांची भेट घडवून द्यावी. आम्हाला आमच्या समस्या मांडायच्या आहेत,’ अशी भूमिका विद्यार्थ्यांनी टिळक भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत मांडली. दरम्यान, आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्यांसाठी काँग्रेस पक्ष खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभा असून, यापुढेही त्यांच्या प्रश्नांसाठी संघर्ष सुरू ठेवणार असल्याचे काँग्रेसने स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Beed News : जिल्हाधिकारी थेट विद्यार्थ्यांच्या रांगेत जमीनवर बसले; डिघोळआंबा शाळेत अन्नाचा आस्वाद घेत 'सरप्राइज स्टिंग'

58 वर्षांनंतर नवरात्रीत बनतोय दुर्मीळ योग! ‘या’ 3 राशींवर होणार विशेष कृपा म्हणे; पैसा, नोकरी अन् व्यवसायात मिळू शकतो मोठा फायदा

India T20 Squad : भुवनेश्वर कुमारचे ४ वर्षांनी पुनरागमन! न्यूझीलंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा, वैभव सूर्यवंशीचीही निवड

दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

IND vs WI, 1st T20I: शे होप पुन्हा नडला, पण पदार्पणवीर नमन धीरने दाखवला इंगा! रुदरफोर्डच्या आक्रमणाने विंडिज १७० धावा पार

SCROLL FOR NEXT