warli art
warli art esakal
नाशिक

आदिवासी वारली कला झाली ग्लोबल; अकराशे वर्षांची समृद्ध परंपरा

दत्ता जाधव

पंचवटी (जि. नाशिक) : महाराष्ट्रातील आदिवासी वारली कला ग्लोबल झाली आहे. तिला अकराशे वर्षांची समृद्ध परंपरा आहे. भास्कर कुलकर्णी यांनी सुमारे ५० वर्षांपूर्वी शोध घेतलेली ही कला पद्मश्री जिव्या सोमा म्हसे यांनी जगभरात पोहोचवली. अनेकांचे वारली कलेत महत्वाचे योगदान असून ती अनंत काळ जिवंत राहील. कलारसिकांना आनंद व नवनिर्मितीसाठी प्रेरणा देत राहील, असे प्रतिपादन वारली चित्रशैलीचे अभ्यासक संजय देवधर यांनी केले. ते वारली चित्र कार्यशाळेच्या प्रारंभी बोलत होते.

कोरोनाचे निर्बंध दूर करण्यात आल्यानंतर वारली आर्ट फाउंडेशनतर्फे आयोजित एकदिवसीय वारली चित्र कार्यशाळेला काल ( दि १४ ) प्रारंभ झाला. मार्गदर्शक संजय देवधर यांनी सहभागींना वारली कलेचा इतिहास, आदिवासी वारली जमातीच्या परंपरा, त्यांची संस्कृती, पद्मश्री जिव्या सोमा म्हसे यांचे योगदान याविषयी माहिती दिली. वारली कलेचे प्रात्यक्षिक व नमुने सादर केले.

उपस्थित कलाप्रेमींनी लोकप्रिय तारपा नृत्याच्या चित्रासह विविध रेखाटने करण्याचा आनंद मिळवला. ही कार्यशाळा दि.१७ पर्यंत दररोज सोनिया अपार्टमेंट, इंद्रकुंड येथे सकाळी १० ते सायंकाळी ४ या वेळेत होणार आहे. सशुल्क सहभागी होण्यासाठी ९४२२२७२७५५ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे. पुढील महिन्यात नाशिकमध्ये दि. १ ते १५ मे दरम्यान वारली आर्ट फाउंडेशनच्यावतीने वारली चित्रकलेचे समूह प्रदर्शन आयोजित करण्यात येणार आहे. त्यामध्ये सहभागी होता येईल. अधिक माहितीसाठी वरील क्रमांकावर संपर्क साधता येईल. जास्तीत जास्त जणांनी या संधीचा लाभ घ्यावा व आपल्या कलाकृती रसिकांपर्यंत न्याव्या असे कळविण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha election 2024 : ''आम्ही खोक्यांच्या मागे गेलो नाहीत; कारण...'', 'सकाळ'च्या मुलाखतीत विनायक राऊत स्पष्टच बोलले

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : धोनी गोल्डन डक; जडेजामुळे चेन्नईने मारली 168 धावांपर्यंत मजल

Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेचा भगवान कुबेरांशी काय संबंध आहे? जाणून घ्या कारण

Job Discrimination : मुंबईत नोकरीसाठी मराठी माणसालाच नो एन्ट्री करणाऱ्या कंपनीला शिकवला धडा, एचआरने मागितली माफी!

Latest Marathi News Live Update : ठाणे, रायगडला उष्णतेचा एलो अलर्ट

SCROLL FOR NEXT