कथरुवंगणवाडी येथे दुर्गंधीयुक्त व गढूळपाणी भरतांना आदीवासी महिला
कथरुवंगणवाडी येथे दुर्गंधीयुक्त व गढूळपाणी भरतांना आदीवासी महिला esakal
नाशिक

पावसाच्या माहेरघरीच पाण्याचा वनवा; पाण्यासाठी जीव धोक्यात

पोपट गवांदे

इगतपुरी (जि. नाशिक) : एकीकडे शासन आदिवासी बांधवांना सर्व सुविधा देण्याची घोषणा करत असतांना मात्र प्रत्येक्षात या बांधवांना कोणत्याही योजनेचा लाभ मिळत नसल्याचे ताजे उदाहरण म्हणजेच पावसाचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या इगतपुरीतील कथरुवंगण पाड्यातील आदिवासी महिलांना रणरणत्या उन्हात पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. दुर्दैव म्हणजे धोकेदायक अशा रेल्वे क्रॉसिंग करुन २ ते ३ टेकड्या चढत जवळपास २ कि.मी. पाण्यासाठी भटकंती करून देखील अतीशय दुर्गंधी युक्त हॉटेल व्यवसायिकांनी वापरलेले पाणी पिण्याची वेळ या आदिवासी बांधवांवर आली आहे.

भर उन्हात पाण्यासाठी भटकंती व जीवमुठीत धरुन रेल्वे क्रॉस करुन जाणाऱ्या महिला

या समस्येला येथील महिला, मुली मेटाकुटीला आल्या आहेत. प्रशासन, लोकप्रतिनिधी या आदिवासी बांधवांची निव्वळ बोळवण करत असल्याने पाणी मागायचे तरी कुणाकडे हा प्रश्न उपस्थित होत आहे.

एकीकडे इगतपुरी नगरपरिषद मोठ्या थाटामाटाने २४ तास भावली धरणातून ३२ कोटी रूपये खर्च करून पाणी योजना शहरात सुरु करत आहे. दुसरीकडे कथरूवंगण पाड्याची वेगळीच व्यथा आहे. हाथ धुने तर सोडाच प्यायला एक घोट पाणी सुध्दा येथील बांधवांना मिळेनासे झाले आहे. हा पाडा नगरपरिषदेचे हद्दीत येतो.

२ ते ३ टेकड्या चढत पाण्यासाठी वणवण करणाऱ्या मुली व महिला

या पाड्यात एकुण ४५ घरे आहेत ज्यात जवळजवळ २०० लोकवस्ती करुन राहतात. पाणीपुरवठ्याच्या नावाखाली नगरपरिषदेने सात वर्षांपूर्वी दोन नळ कनेक्शन दिले. जवळच एका जुन्या टाकित हे पाणी साठवले जाते. पंधरा दिवसात एक वेळा जास्तीत जास्त वीस मिनिटे पाणी पुरवठा केला जातो असे येथील आदिवासी बांधव सांगतात. सध्या तेही मिळत नसल्याचे सांगण्यात आले. मागील काही दिवसांपासून येथे तळेगाव येथील विहिरीतून पाणी सोडण्यात येते मात्र हे पाणी गढूळ, उंदिर व साप मेलेले आणि केस असलेले पाणी पुरविण्यात येत असल्याचे महिलांनी सांगितले.

सध्या पाड्यावरिल आदिवासी महिला जवळपास दोन किलोमिटर रेल्वेरुळातून जीव धोक्यात घालुन महामार्गावर येथील हॉटेल मधून झिरपणारे पाणी ज्या रेल्वे हद्दीच्या मोरीत जमा होते तेथून आणि पर्यायी महामार्गालगत असलेल्या गढूळ खड्ड्यातून पायपीट करत, जीवावर खेळत पाणी आणत आहे.एका ठिकाणी नैसर्गिक स्त्रोतांतून डबक्यात गढूळ पाणी उपलब्ध होत आहे.तर दुसऱ्या ठिकाणी हॉटेल व्यवसायिकांचे सांडपाणी वापरण्याची वेळ आली आहे. येथील आदिवासी बांधवांनी प्रशासनाने लक्ष्य द्यावे अशी मागणी केली आहे.

उत्तर महाराष्ट्र सह मुंबई सारख्या महानगराची तहान भागवणारा हा इगतपुरी तालुका आज स्वतःच पाण्याविना व्याकुळ झालेला आहे.धरणाचे माहेरघर म्हणून ओळखला जाणारा हा तालुका,पण आज ह्याच इगतपुरीतील काही गावांची पाड्यांची अवस्था धरण उशाला आणि कोरड घशाला अशी झाली आहे. कधी गढूळ तर कधी दुर्गंधीयुक्त पाणीच नशिबाला येते.

इथल्या पाड्यांची अवस्था इथले स्थानिक प्रशासन चांगलीच जाणून आहे. मात्र हि अवस्था पालटायला काहीच प्रयत्न होतांना दिसून येत नाही. त्यामुळं यांचा पाण्याचा वनवास कधी संपणार हाच प्रश्न आहे.

"सध्या आम्ही रेल्वेरुळालगतच्या मोरी मधून पाणी आणतो. हे पाणी महामार्ग लगत असलेल्या हॉटेलमधून झिरपते आणि खाली येते.हे पाणी आम्ही पिण्यासाठी वापरतो.त्यामुळे आमचे लहान मुले नेहमीच आजारी पडतात."

-कल्यानी भालंगे, स्थानिक महिला

"अनेकदा वेळोवेळी निवेदन देऊनही काहीच हालचाल इगतपुरी नगरपरिषदेने केलेली नाही.येथील परिस्थिती नगरपरिषदेचे अधिकारी, कर्मचारी, नगरसेवक सर्वांना कळवली आहे, कुणीही जबाबदारी घ्यायला तयार नाही.मात्र निवङणुका आल्या की मत मागायला येतात."

-अनिल भोईर, स्थानिक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Trucks Carrying Cash: चार ट्रक, हजारो कोटींच्या मळलेल्या नोटा अन् पोलीस; वाचा चित्रपटालाही लाजवेल असे थरारनाट्य

Sushma Andhare: सुषमा अंधारेंना घ्यायला आलेलं हेलिकॉप्टर क्रॅश, कारण अस्पष्ट

Share Market Opening: आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शेअर बाजाराची जोरदार सुरुवात; निफ्टी नवीन विक्रमी उच्चांकावर

Freedom At Midnight: 'फ्रिडम एट मिडनाइट' चा फर्स्ट लूक आऊट; जवाहरलाल नेहरूंच्या भूमिकेत 'हा'अभिनेता

Covaxin: कोव्हिशिल्डच्या गोंधळानंतर कोव्हॅक्सिन बनवणाऱ्या भारत बायोटेकचा मोठा दावा, वाचा काय म्हणाली कंपनी

SCROLL FOR NEXT