agitation esakal
नाशिक

Tribals Ulgulan Morcha: आदिवासींचा उद्या उलगुलान मोर्चा

सकाळ वृत्तसेवा

Tribals Ulgulan Morcha : धनगर समाजाचा आदिवासींमध्ये (अनुसूचित जमातीच्या) आरक्षणात समावेश करू नये, मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली असणाऱ्या आदिवासी सल्लागार परिषदेची तत्काळ बैठक घ्यावी या प्रमुख मागण्यांसह प्रलंबित मागण्यांसाठी नाशिक जिल्ह्यात कार्यरत असणाऱ्या सर्व आदिवासी सामाजिक संघटनांतर्फे आदिवासींचा उलगुलान मोर्चा काढण्यात येणार आहे. (Tribals Ulgulan Morcha tomorrow nashik)

मोर्चा गुरुवारी (ता. १२) दुपारी बाराला तपोवन मैदानापासून सुरू होईल. तपोवन मैदान- छत्रपती संभाजीनगर नाका- पंचवटी डेपो- निमाणी- मालेगाव स्टॅन्ड- रविवार कारंजा- रेडक्रॉस सिग्नल- शालिमार- मध्यवर्ती बसस्थानक ते जिल्हाधिकारी कार्यालय,

नाशिक या मार्गाने शिस्तबद्ध पद्धतीने आदिवासींचा उलगुलान मोर्चा काढण्यात येईल.

मोर्चाचा शेवट जिल्हाधिकारी कार्यालय येथे होईल. मोर्चात विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, आमदार हिरामण खोसकर, जे. पी. गावित, सुनील भुसारा, मंजूळाताई गावित,

माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण, माजी आदिवासी विकासमंत्री मधुकर पिचड यांच्यासह आजी-माजी आमदार, खासदार, जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवक, सरपंच यांसह आदिवासी सामाजिक संघटनांचे पदाधिकारी,

कार्यकर्ते, आदिवासी समाजबांधव उपस्थित राहणार आहेत. आदिवासींचे हक्क, अधिकार, आरक्षण, अस्तित्व टिकविण्यासाठी आदिवासी समाजबांधवांनी सहभागी व्हावे, असे आवाहन उलगुलान मोर्चाचे समन्वयक अशोक बागूल,

राजाभाऊ वाघले, कैलास शार्दूल, शिवाजी ढवळे, अर्जुन गांगुर्डे, लकी जाधव, नामदेव बागूल, विशाल माळेकर, योगेश रिंझड, प्रभाकर फसाळे, विकी मुंजे, पृथ्वीराज अंडे यांच्यातर्फे करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange: ''तुम्ही बंजारा समाजासारखे दिसत नसतानाही आरक्षण का खाल्लं?'', धनंजय मुंडेंना उद्देशून जरांगेंचं मोठं विधान

अडीच वर्षांपूर्वी विवाह, पतीसह सासरच्यांकडून छळ; पोलिसाच्या पत्नीनं तिसऱ्या मजल्यावरून उडी घेत संपवलं जीवन, दिरानं रुग्णालयात नेलं, पण...

IND vs WI 1st Test Live: अरे आताच फिफ्टी झाली होती, कशाला घाई केली! Shubman Gill चा चुकीचा फटका अन् विंडीजला मिळाली विकेट

Crop Loss: पिकेच झाली उद्‍ध्वस्त, खत देणार कशाला? नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे ७० हजार टनांहून अधिक साठा पडून

Layoff 2025: अमेरिकन कंपनीचा धक्कादायक निर्णय; 4 मिनिटांच्या कॉलमध्येच भारतीय कर्मचाऱ्यांना कामावरुन काढलं

SCROLL FOR NEXT