पान-३
-----------
ध्वजारोहणानंतर त्र्यंबकनगरी पुन्हा गजबजली
-----------
दहा हजारांवर भाविकांची गर्दी, कुशावर्त तीर्थावर स्नान; बाजारपेठा पूर्ववत
-----------
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता.१ : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणामुळे शुक्रवार आणि शनिवार (ता.३१) असे दोन दिवस त्र्यंबकेश्वर मंदिर बंद असल्याने सोहळ्यानंतर रविवारी येथे नेहमीप्रमाणे गजबज पाहायला मिळाली. तब्बल दहा हजारावर भाविकांनी दर्शन आणि तीर्थराज कुशावर्तावर स्नानासाठी गर्दी केली होती. दरम्यान बाजारपेठाही पूर्ववत झाल्याने व्यावसायिकांनी सुस्कारा सोडला.
-----------
राष्ट्रपती, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह राज्यातील अर्धा डझन मंत्र्यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण सोहळा नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे एकाच वेळी झाला. यानिमित्ताने पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला. त्र्यंबकेश्वरला प्रवेशद्वारापासून ते कुशावर्त तीर्थापर्यंतच्या रस्त्यालगत दोन्ही बाजूला सफेद पडदे लावून त्यावर कुंभमेळ्याचे फलक लावण्यात आले. जेणेकरून रस्त्याच्या बाजूला सुरु असलेली कामे प्रकाशझोतात येणार नाही. नागरिकांना घराबाहेर पडण्यास बंदी घालण्यात आलेली होती. त्यामुळे ३० व ३१ ऑक्टोबरला त्र्यंबकराज मंदिरात सर्वसामान्य व्यक्तींना दर्शन घेता आले नाही. तीर्थराज कुशावर्ताही स्नानास बंदी घातलेली होती. नगरपालिका प्रशासनाने स्थानिकांना या संदर्भात सूचना देवून सुरक्षा व स्वच्छता ठेवली. दोन दिवसांचा ध्वजारोहणाचा अलौकिक सोहळा पार पडताच त्र्यंबकवासीय घराबाहेर पडले आणि त्यांनी थेट मंदिर व कुशावर्त तीर्थ गाठले. भाविकांनी या ठिकाणी स्नान करत त्र्यंबकराजाचे दर्शन घेतले. रविवारी यानिमित्त भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचे दिसून आले. फुल विक्रेते, हॉटेल चालकांसह व्यावसायिकांची दुकाने सकाळपासूनच दुकाने खुली केली. दीपावली सणामुळे बाजारात खरेदीचा उत्साह संचारलेला असल्याने रविवारी नागरिकांनी खरेदीचा मनमुराद आनंद लुटला.
१६-१
कुशावर्तावरही गर्दी
तीर्थराज कुशावर्त तीर्थावर मर्यादित भाविकांनाच स्नान करणे शक्य होते. त्याला पर्याय म्हणून पेगलवाडी येथील प्रयागराज तीर्थाशेजारी गोदावरी नदीवर नवीन घटांची निर्मिती करण्यात आली. या घाटांवरही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आल्याने धार्मिकदृष्ट्या या घाटांनाही (नवीन कुशावर्त) महत्त्व प्राप्त झाले आहे. या ठिकाणी भाविकांनी आता जाण्यास प्रारंभ केला असून येथील कामकाज अद्याप पूर्ण झालेले नाही.
----------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.