नाशिक

कुंभमेळा मंत्री महाजनांची साधु-महंतांसोबत चर्चा

CD
NSK26H33530 त्र्यंबकेश्वर : आखाड्यातील विकासकामांबाबत साधू महंतांशी चर्चा करताना मंत्री गिरीश महाजन. NSK26H33531 ( सिंगल फोटो) त्र्यंबकेश्वर : साधू महंतांसोबत भोजनाचा आस्वाद घेताना मंत्री महाजन. (छायाचित्रे : विकी कदम ) -------------- ३६-३ कामांची पाहणी अन साधू- महंतांसोबत भोजन महाजनांकडून विकासकामांचा आढावा ः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज भेट देणार सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता.२५ : सिंहस्थ कुंभमेळा ध्वजारोहण सोहळा आठ दिवसांवर आल्याने त्र्यंबकेश्‍वरमधील कामांना कमालीची गती मिळाली आहे. कुंभमेळा मंत्री तथा नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी रविवारी प्रत्यक्ष या कामांची पाहणी केली. तसेच साधू-महंतांशी चर्चा करत त्यांच्यासोबत भोजनाचा आस्वाद घेतला. दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोमवारी (ता.२६) भेट देऊन कामांचा आढावा घेणार आहेत. ------------ येत्या ३१ ऑक्टोबरला त्र्यंबकेश्‍वरला ध्वजारोहण होणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या दुपारी दोनला गोदाआरती व त्र्यंबकराज मंदिरात पूजा करणार आहेत. या सोहळ्यानिमित्त राज्यातील मंत्री, नेते, आमदार व खासदार उपस्थित राहतील. प्रशासनाकडून तयारी केली जात असून जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी अधिकाऱ्यांची रंगीत तालीम घेतली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्र्यंबकेश्‍वरला सर्व आखाड्यांच्या साधू-महंतासोबत चर्चा करणार आहेत. या पार्श्‍वभूमीवर कुंभमेळा मंत्री महाजन यांनी रविवारी त्र्यंबकेश्‍वरमधील साधू-महंतांशी चर्चा केली. आखाड्यांमधे सुरु असलेली कामे, कुंभमेळ्याच्या दृष्टीने शहरातील विकास कामे, तिर्थराज कुशावर्त तीर्थावरील कामे अहोरात्र सुरु आहेत. बुधवार (ता.२८) पर्यंत ही सर्व कामे पूर्ण करण्याचे प्रशासनाचे नियोजन आहे. त्यादृष्टीने १२ ते १५ तास कामगार या ठिकाणी काम करत आहेत. या सर्व कामांची पाहणी करण्यासाठी उपमुख्यमंत्री शिंदे सोमवारी नाशिकला येत आहेत. नगराध्यक्षा त्रिवेणी तुंगार यांनी नगरपालिकेचे प्रश्‍न त्यांच्यासमोर मांडण्याची तयारी केली आहे. …. १६-१ साधू- महंतांसोबत भोजन स्वामी सागरानंद सरस्वती महाराज यांच्या चतुर्थ पुण्यतिथीचा कार्यक्रमाप्रसंगी पंचायती आनंद आखाड्यात कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी समाधीचे दर्शन घेत साधू-महंतांसोबत भोजन केले. भोजनासाठी त्यांनी जमिनीवर आसन मांडले. मात्र, त्यांना खुर्चीवर बसण्याची विनंती केल्यानंतर त्यांनी खुर्चीवर बसत भोजनाचा आस्वाद घेतला. … ठिकाणात बदल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे साधू-महंतांच्या आशीर्वादासाठी सोमवारी त्र्यंबकेश्‍वरला येत आहेत. सकाळी अकराला होणाऱ्या या सोहळ्याचे नियोजन अगोदर त्र्यंबकेश्‍वर ज्योतिर्लिंग मंदिरात करण्यात आले होते. मात्र, जागा कमी पडत असल्याने आता हा कार्यक्रम श्रीचंद्र भगवान लॉन्स येथे होणार आहे. ------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मल्लिकार्जुन खरगेंच्या 'त्या' विधानावरून वाद पेटला! अमित शहांसह भाजपचे नेते आक्रमक; म्हणाले...

Pune News: माळेगावात वनपाल सहा हजारांची लाच घेताना रंगेहाथ; शेतातील माती वाहतुकीत अडथळा न आणण्यासाठी मागितले पैसे

MI NEXT CAPTAIN: मुंबई इंडियन्सचा पुढचा कर्णधार कोण? माजी खेळाडूने सांगून टाकलं नाव; रोहित शर्मा अन् हार्दिक पांड्याबद्दल मोठं वक्तव्य!

IND W vs ZIM W: हरमनप्रीत-दीप्तीने रचला शतकांचा डाव! भारताने झिम्बाब्वेसमोर ठेवलं मोठं लक्ष्य, दुसऱ्या डावात थरार सुरू

Mohol Crime New: मोहोळमध्ये ८५ वर्षीय वृद्धेला गंडा; दूध देण्याचे आमिष दाखवून ५० हजारांचे सोन्याचे दागिने लंपास

SCROLL FOR NEXT