नाशिक

तीन ग्रामपंचायत अधिकारी निलंबित

CD
फोटो : 33399 त्र्यंबकेश्‍वर : ग्रामपंचायतीला भेट दिल्यानंतर आढावा घेताना सीईओ ओमकार पवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा फडोळ. ... तीन ग्रामपंचायत अधिकारी निलंबित सीईओ ओमकार पवार यांचा त्र्यंबकेश्वर दौऱ्यात दणका सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता.२३ : कामातील त्रृटी आणि कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांनी त्र्यंबकेश्‍वर तालुक्यातील तीन ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना निलंबित केले. महादेवनगरचे मुरलीधर गावित, टाकेहर्षचे तुषार राजपूत व देवडोंगरीचे सतीश बच्छाव यांना निलंबनाचा दणका दिला. सीईओ पवार यांनी शुक्रवारी त्र्यंबकेश्वर तालुक्याच्या दौरा केला. यात त्यांना महादेवनगरचे गावित यांच्यावर ग्रामपंचायतीतील आर्थिक अनियमिततेसह मुख्यालयात अनधिकृतरीत्या अनुपस्थित राहणे, मासिक सभेला गैरहजर राहणे, लेखापरीक्षणासाठी शासकीय दप्तर उपलब्ध न करून देणे आणि कारणे दाखवा नोटिशीला मुदतीत खुलासा सादर न करणे, असे आरोप असल्याचे निदर्शनास आले. टाकेहर्षचे राजपूत यांच्यावर २६ जानेवारी २०२६ रोजी ग्रामपंचायत कार्यालयात ध्वजवंदन न केल्याचा तसेच कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. देवडोंगरीचे बच्छाव यांच्याविरुद्ध १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतील आर्थिक अनियमितता, कारणे दाखवा नोटिशीला वेळेत खुलासा न देणे आणि कर्तव्यात कसूर करणे, या बाबींवरून कारवाई करण्यात आली आहे. निलंबनाच्या कालावधीत संबंधित अधिकाऱ्यांचे मुख्यालय पंचायत समिती, त्र्यंबकेश्वर (मालेगाव) येथे निश्चित करण्यात आले आहे. मुख्यालयी हजर राहणे, नियमानुसार निर्वाह भत्त्यासाठी आवश्यक प्रमाणपत्र सादर करणे आणि ग्रामपंचायतींचा कार्यभार संबंधित ग्रामपंचायत अधिकाऱ्यांकडे हस्तांतरित करणे बंधनकारक केले आहे. पंचायत समितीलाही भेट मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांनी त्र्यंबकेश्वर तालुक्याच्या दौऱ्यादरम्यान पंचायत समिती त्र्यंबकेश्वर येथेही भेट देऊन प्रशासकीय कामकाजाची पाहणी केली. यावेळी गटविकास अधिकारी रविकांत सानप उपस्थित होते. पंचायत समिती स्तरावरून ग्रामपंचायतींच्या कामकाजावर ठेवण्यात येणारे नियंत्रण, विविध विकासकामांची अंमलबजावणी आणि प्रशासकीय यंत्रणेची कार्यक्षमता या अनुषंगाने त्यांनी आढावा घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IMD weather forecast 24 October : २४ ऑक्टोबरला देशातील हवामानात मोठा उलटफेर; गुलाबी थंडी वाढणार की पावसाची एन्ट्री? पाहा हवामानाचा नवा अंदाज!

शिवरायांच्या स्वराज्याची शान! महाराष्ट्रातील ‘या’ 5 किल्ल्यांना एकदा तरी भेट द्याच

Marathi News Live Updates: नाशिकमध्ये कांद्याने भरलेला पिकअप पलटी, दुचाकीस्वार गंभीर जखमी

Global internet security threat : इंटरनेट विश्वात मोठा भूकंप! गुगल, ॲमेझॉनसह OpenAI हाय अलर्टवर; जगभरातील अनेक वेबसाइट्स अचानक का बंद झाल्या?

भारतीय संघात बदल; ईशान किशनची माघार, त्याच्याजागी संघात नवा खेळाडू

SCROLL FOR NEXT