नाशिक

दिवाळी सुट्यांमुळे त्र्यंबकेश्वरात भाविकांची मांदियाळी

CD
दिवाळी सुट्यांमुळे त्र्यंबकेश्वरात भाविकांची मांदियाळी पूर्व दरवाजातून दर्शनासाठी सहा ते सात तास, तर देणगी दर्शनासाठी तीन तासांचा कालावधी सकाळ वृत्तसेवा त्र्यंबकेश्वर, ता.१४ : दिवाळीच्या सुट्यांमुळे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे भाविकांची मोठी गर्दी होत आहे. सलग सुट्यांचा लाभ घेत राज्याच्या विविध भागांतून भाविक दर्शनासाठी त्र्यंबकेश्वरमध्ये दाखल होत आहेत. त्यामुळे मंदिर परिसरात दिवसभर भाविकांची वर्दळ पाहायला मिळत आहे. पहाटेपासूनच दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागण्यास सुरुवात होत असून, पहाटे चार वाजेपासून भाविक मंदिर परिसरात दर्शनाच्या प्रतीक्षेत उभे राहत आहेत. जसजसा दिवस पुढे सरकत आहे, तसतशी गर्दीत वाढ होत आहे. भाविकांची संख्या वाढल्याने दर्शनासाठीही अधिक वेळ लागत आहे. मंदिराच्या पूर्व दरवाजातून सर्वसामान्य भाविकांना दर्शनासाठी सुमारे सहा ते सात तासांचा कालावधी लागत आहे. तर देणगी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना सुमारे तीन तास प्रतीक्षा करावी लागत आहे. त्यामुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना गर्दीचा त्रास सहन करावा लागत आहे. दिवाळी सुट्यांचा कालावधी संपेपर्यंत भाविकांची गर्दी कायम राहण्याची शक्यता आहे. भाविकांनी दर्शनासाठी येताना संयम बाळगावा तसेच मंदिर प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Pakistan Relations : तब्बल ३ वर्षांनी पाकिस्तानी मंत्री भारतात येणार! 'ऑपरेशन सिंदूर'नंतर पहिल्यांदाच मोठी घडामोड; दिल्लीत नेमकं काय घडतंय?

Zapatlela Untold Story : 'तात्या विंचू' लंडनला कसा पोहोचला? सुपरहिट मराठी सिनेमाचं आणि शरद पवारांचं 'ते' खास कनेक्शन आलं समोर!

Latest Marathi News Live Update: जाणून घ्या दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

Election Commission: उत्तर प्रदेश, पंजाबसह ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या तारखा कधी जाहीर होणार? काय आहे अपडेट?

Kartiki Ekadashi 2026 : विठ्ठल भक्तांसाठी आनंदाची बातमी! पंढरपूरच्या विठुरायाचे २४ तास दर्शन सुरू; 'या' वेळेस फक्त काही मिनिटेच मिळणार दर्शन!

SCROLL FOR NEXT