नाशिक

कुशावर्तालगतच्या जुन्या वाड्यांचे तोडकाम टाळा!

CD
फोटो -NSK26H32030 त्र्यंबकेश्‍वर : येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देताना पुरोहित संघाचे अध्यक्ष मनोज थेटे. कुशावर्तालगतच्या जुन्या वाड्यांचे तोडकाम टाळा! ------------------------------------------ त्र्यंबकेश्‍वरच्या पुरोहित संघाचे मुख्यमंत्र्यांना साकडे सकाळ वृत्तसेवा त्र्यंबकेश्वर, ता.१२ : आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर येथील कुशावर्त तीर्थालगत असलेल्या सुमारे ३०० ते ३५० वर्षे जुन्या ऐतिहासिक वाड्यांचे प्रस्तावित तोडकाम टाळावे, अशी विनंती पुरोहित संघाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. या वास्तूंचा ऐतिहासिक वारसा जतन करून पर्यायी विकास आराखडा तयार करावा, तसेच स्थानिक रहिवाशांचे हित आणि धार्मिक परंपरा यांचा विचार करून निर्णय घ्यावा, अशी मागणी संघाचे अध्यक्ष मनोज थेटे यांनी निवेदनाद्वारे केली आहे. कुंभमेळ्याच्या निमित्ताने शहरात रस्ते, वाहतूक, स्वच्छता आणि पायाभूत सुविधांचा विकास होणे आवश्यक आहे. शासनाच्या विकासकामांचे स्वागत करतानाच, कुशावर्त तीर्थालगतच्या जुन्या वाड्यांचा प्रश्न संवेदनशीलतेने हाताळण्याची गरज असल्याचे निवेदनात म्हटले आहे. पर्यायी आराखड्याला प्राधान्य द्या कुशावर्त परिसरातील वाड्यांच्या प्रस्तावित तोडकामाचा पुनर्विचार करून पर्यायी आराखडा तयार करावा. शक्य असेल तेथे तोडकामाचे प्रमाण कमी ठेवून ऐतिहासिक वास्तूंचे मूळ स्वरूप आणि वारसा जतन करावा. तसेच संबंधित स्थानिक रहिवाशांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी, हरकती आणि मते जाणून घ्यावीत. कुंभमेळ्याच्या निमित्ताने त्र्यंबकेश्वरमध्ये आधुनिक सुविधा निर्माण करताना ऐतिहासिक वारशाचे संवर्धन आणि स्थानिक नागरिकांचे हित यांचा समतोल राखावा. या विषयाची गांभीर्याने दखल घेऊन संबंधित विभागांना आवश्यक सूचना द्याव्यात आणि वाड्यांचे तोडकाम टाळण्यासाठी सकारात्मक निर्णय घ्यावा, असे आवाहन निवेदनात केले आहे. इन्फो... शेतजमिनींच्या अधिग्रहणातून वगळावे सिंहस्थ कुंभमेळा २०२७ साठी साधुग्राम उभारण्याकरिता प्रस्तावित जमीन अधिग्रहणातून त्र्यंबकेश्वर परिसरातील शेतकऱ्यांना वगळावे, अशी मागणी बाधित होण्याची शक्यता असलेल्या शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. साधुग्रामसाठी सुपीक शेतजमिनींचे अधिग्रहण केल्यास शेतकऱ्यांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे पर्यायी जागेचा शोध घ्यावा, तसेच मंजूर एनए लेआउटमधील प्लॉटधारकांच्या जमिनी प्रस्तावित क्षेत्रातून वगळण्याचा विचार करावा, तसेच प्रस्तावित अधिग्रहणामुळे बाधित होण्याची शक्यता असलेल्या २०० हून अधिक शेतकऱ्यांची स्वतंत्र बैठक घेऊन त्यांच्या हरकती व सूचना ऐकून घ्याव्यात, अशी मागणी कल्पेश कदम व पुरुषोत्तम कडलग आदी शेतकऱ्यांनी केली आहे.

विराट कोहलीवर पाच कोटींचा आरोप करणाऱ्या फलाहारी महाराजांनी मागितली माफी, म्हणाले...

Mumbai Protest Faceoff : "काय करायचं ते करा!"; शिवाजी पार्कवर पोलिसांनी अडवताच अमित ठाकरे भडकले, पोलिसांनी घेतलं ताब्यात

३५ वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीच्या शरीराचा सौदा, ठाण्यात हायप्रोफाईल देहविक्रीचे रॅकेट उघड; महिलेला रंगेहाथ अटक

Daily Horoscope: आजचे राशिभविष्य : मेषसह या राशींना व्यवसायात यश; काहींना अचानक धनलाभाची शक्यता

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT