An all-party meeting held at the municipal office on Wednesday. Cow urine and panchagavya being sprinkled around the Jyotirlinga temple
An all-party meeting held at the municipal office on Wednesday. Cow urine and panchagavya being sprinkled around the Jyotirlinga temple esakal
नाशिक

Trimbakeshwar: गोमूत्र शिंपडत ‘बम बम भोले'चा गजर अन महाआरती; सर्व पक्षिय बैठकीत शांतता अबाधित राखण्याची सूचना

सकाळ वृत्तसेवा

Trimbakeshwar : येथील नगरपालिका कार्यालयात आज दुपारी सर्वपक्षीय प्रमुख आणि स्थानिक कार्यकर्त्यांची बैठक झाली. शहराची शांतता अबाधित राहील आणि नावलौकीक खराब होऊ नये यासाठी प्रयत्न करावेत, असे बैठकीत सुचविण्यात आले.

माजी नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर, सुरेश गंगापुत्र, पुरुषोत्तम कडलग, कोकणी, लक्ष्मीकांत थेटे, अतुल जोशी, अत्तार, नबियुन शेख, सय्यद आदी उपस्थित होते. तसेच सकाळी ज्योतिर्लिंग मंदिराच्या आवारात गोमूत्र शिंपडून ‘बम बम भोले'चा गजर करत महाआरती करण्यात आली. (Trimbakeshwar Maha Aarti sprinkling gomutra Instruction to maintain peace in all religions party meeting at nagapalika nashik news)

ज्योतिर्लिंग मंदिर बंद होण्याच्या कालावधीत शनिवारी (ता.१३) रात्री विशिष्ट जमावाच्या तरुणांनी मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. सुरक्षा रक्षकांनी त्यास विरोध केला. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार संबंधितांविरुद्ध त्र्यंबकेश्‍वर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

शनिवारच्या घटनेच्या पार्श्‍वभूमीवर आज (ता.१७) सकाळी विश्‍व हिंदू परिषद, बजरंग दल, भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते, स्थानिक हिंदू संघटना आणि मंडळांचे पदाधिकारी मंदिरासमोर एकत्र जमले आणि घटनेचा निषेध करण्यात आला.

उत्तर महादरवाज्या भिंतीवरील हिंदू शिवाय मंदिरात इतरांना प्रवेश नसल्याच्या सूचनेचा टपरीने झाकलेला फलक मोकळा करण्यात आला. कार्यकर्ते, पदाधिकारी मंदिराच्या आवारात प्रवेशकर्ते झाले.

बादल्यांमधील गोमूत्र आणि पंचगव्य उत्तर महादरवाजा ते बकुळ वृक्षापर्यंत शिंपडण्यात आले. त्यानंतर फुले व श्रीफळ अर्पण करण्यात आले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

भाजप आध्यात्मिक आघाडीचे तुषार भोसले प्रत्येकाने आपल्या मर्यादा पाळाव्यात अन्यथा त्याचे उल्लंघन केल्यास विषय वादग्रस्त होतो, असे स्पष्ट केले. गंगा गोदावरी पंचकोठी पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ल,

विश्‍व हिंदू परिषदेचे विभाग मंत्री अनिल चांदवडकर, जिल्हाप्रमुख देविदास वारुंगसे, राहुल सोनकुळ, विनोद थोरात, मनोहर ओक, अखिल भारतीय पुरोहित संघाचे दवे, डॉ. दिलीप जोशी, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष मनोज काण्णव, गोविंद मुळे आदी उपस्थित होते. त्र्यंबकेश्‍वर मंदिराच्या आवारात रुद्र पठण करून महाआरती करण्यात आली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'जिरेटोप देणाऱ्याला डोकं नाही अन् घालून घेणाऱ्यालाही डोकं नाही'; उद्धव ठाकरेंचा भर पावसात हल्लाबोल

RCB vs DC Stale Food : कर्नाटक क्रिकेट असोसिएशनच्या अडचणीत वाढ; आरसीबी - दिल्ली सामन्यात शिळं जेवण दिल्याप्रकरणी FIR दाखल

Nor’westers: 'कालबैसाखी'च्या अभ्यासासाठी भारताचा पहिला प्रोजेक्ट लवकरच कार्यरत; जीवितहानी टळणार?

Petrol, Diesel Rates : पेट्रोल-डिझेल होणार स्वस्त? सरकारचा 'टॅक्स'संदर्भात मोठा निर्णय

IPL 2024 SRH vs GT Rain : हैदराबाद - गुजरात सामन्यात पावसाची शक्यता... सीएसके अन् आरसीबीला फुटला घाम

SCROLL FOR NEXT