नाशिक

कोट्यवधींचा खर्च, तरी कुशावर्त कोरडेच!

CD
छायाचित्र आहे... कोट्यवधींचा खर्च, तरी कुशावर्त कोरडेच! पितृपक्षात तीर्थस्नानालाही पाण्याची वानवा; वारंवार बदलणाऱ्या जलवाहिन्या, मोटारींच्या बिघाडाने त्र्यंबकेश्वरचा पाणीप्रश्न कायम सकाळ वृत्तसेवा त्र्यंबकेश्वर, ता. ७ : देशभरातून भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या त्र्यंबकेश्वरमध्ये पितृपक्ष सुरू असतानाही कुशावर्त तीर्थात स्नानासाठी पुरेसे पाणी उपलब्ध नसल्याने भाविकांची मोठी गैरसोय होत आहे. भाद्रपद पौर्णिमेपासून सुरू झालेला पितृपक्ष तीर्थस्नानाविना पार पडत असल्याचे चित्र आहे. शहरातील पाणीटंचाईचा प्रश्न वर्षानुवर्षे कायम असताना पाणीपुरवठा योजनेवर कोट्यवधी रुपये खर्च होऊनही परिस्थितीत अपेक्षित सुधारणा झालेली नाही. कुशावर्त तीर्थात सध्या नवीन जलवाहिन्या टाकण्याचे काम सुरू आहे. मात्र, जलवाहिन्यांच्या मोजमापांमध्ये तफावत असल्याने कामात वारंवार बदल करावे लागत असून, त्याचा परिणाम कामाच्या गतीवर होत असल्याची चर्चा आहे. कामातील विविध त्रुटींमुळे पाणीपुरवठ्याशी संबंधित कामे लांबत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्र्यंबकेश्वर शहराची लोकसंख्या सुमारे १२ हजार असून, दररोज २५ ते ३० हजार भाविक शहरात येतात. सुटीचे दिवस आणि सण-उत्सवांच्या काळात ही संख्या चारपटीने वाढते. त्यामुळे स्थानिक नागरिकांसह बाहेरून येणाऱ्या भाविकांसाठी पिण्याचे तसेच वापराचे पाणी किती प्रमाणात आवश्यक आहे, याचे प्रभावी नियोजन होणे गरजेचे आहे. मात्र, वाढत्या लोकसंख्येचा आणि भाविकांच्या संख्येचा विचार करून दीर्घकालीन पाणीपुरवठा व्यवस्था उभारण्यात आलेली नसल्याची नागरिकांची तक्रार आहे. दर १२ वर्षांनी होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर पाणीपुरवठा व्यवस्था सुधारण्यासाठी विविध टप्प्यांवर मोठा निधी खर्च करण्यात आला. १९९०-९१ मध्ये अंबोली धरणातून पाणीपुरवठ्यासाठी खर्च करण्यात आला. त्यानंतर २००२-०३ च्या सुमारास सिमेंटच्या जलवाहिन्या बदलून लोखंडी जलवाहिन्या टाकण्यात आल्या. पुढे २०१५-१६ च्या कालावधीतही पाणीपुरवठा व्यवस्थेत बदल करण्यात आले. त्यानंतर गौतमी-गोदावरी धरणातून वाहिन्यांद्वारे पाणी आणण्याची व्यवस्था करण्यात आली. एवढा खर्च आणि वारंवार बदल करूनही त्र्यंबकेश्वरचा पाणीप्रश्न कायम असल्याचे चित्र आहे. पाणीपुरवठा यंत्रणेच्या देखभाल-दुरुस्तीसाठी आवश्यक कुशल मनुष्यबळ आणि तांत्रिक कर्मचारी उपलब्ध नसल्याने अडचणी वाढत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. वीज मोटारी वारंवार जळणे, जलवाहिन्या तुटणे आणि पाणी उपसून टाक्या भरण्यासाठी होणारा मोठा खर्च यामुळे पाणीपुरवठा व्यवस्थेवर आर्थिक ताण वाढत आहे. परिणामी, पाणीपुरवठ्यावरील खर्च आणि त्यातून मिळणारे उत्पन्न यांचा ताळमेळही साधला जात नसल्याची चर्चा आहे. पाणीपुरवठा विभागाच्या कार्यपद्धतीबाबत नागरिकांकडून सातत्याने तक्रारी होत आहेत. गेल्या १२ वर्षांत या विभागावर झालेला खर्च, करण्यात आलेली कामे आणि त्यातून प्रत्यक्षात झालेली सुधारणा यांचा लेखाजोखा तपासल्यास पाणीप्रश्नाचे वास्तव स्पष्ट होईल, असे नागरिकांचे मत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SIR voter list: देशातील 42 निवृत्त न्यायमूर्तींचं खुलं पत्र! SIR वरुन सुरु असलेल्या वादावर स्पष्ट केली भूमिका

India Alliance Protest : 'देश हायजॅक केलाय, लोकशाहीची हत्या सुरूय'; राहुल गांधींचा केंद्र सरकारवर हल्लाबोल, आंदोलनासाठी 300 खासदार राजघाटावर

NANA PATEKAR: नाना पाटेकर रोज ६० सिगारेट ओढायचे; वयाच्या ५६व्या वर्षी सोडली सवय, पण हृदयाला झालेलं नुकसान भरून निघतं का? जाणून घ्या

Latest Marathi News Live Update: इंडिया आघाडीचे खासदार राजघाटावर

Nana Patekar Death : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे Cardiac Arrest ने निधन; हार्ट अटॅक आणि कार्डियाक अरेस्टमध्ये काय फरक असतो? शरीरात नेमकं काय घडतं?

SCROLL FOR NEXT