Triple accident involving 2 buses & container  esakal
नाशिक

Nashik Accident News: लोहोणेर तालुका देवळा येथे 2 बस अन् कंटेनरचा तिहेरी अपघात; सुदैवाने जीवितहानी नाही

सकाळ वृत्तसेवा

Nashik Accident News : येथील विंचूर-प्रकाशा महामार्गावर लोहणेर गावाजवळील पेट्रोलपंम्प समोर असलेल्या गतिरोधक जवळ दोन एसटी बस व एक मालवाहतूक ट्रक यांच्यात झालेल्या तिहेरी अपघातात दोन बस चालकांसह तीन प्रवासी जखमी झाले आहेत.

सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नाही. (Triple accident involving 2 buses container at Lohoner Taluka Deola Nashik Accident News)

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

या बाबत सविस्तर वृत्त असे की, दोंडाईचा आगाराची बस ( MH 14 BT 2180) सटाण्याच्या दिशेने जात असतांना लोहणेर गावाजवळील पेट्रोल पंम्प समोरील गतिरोधक जवळ हळू झाली असता, मागून येणाऱ्या कांद्याच्या भरलेल्या ट्रक ( GJ 25 U 5141) ने मागून जोरदार धडक दिली.

यामुळे बसचे नियंत्रण सुटल्याने देवळ्याच्या दिशेने येत समोरून येणारी दुसऱ्या नंदुरबार - नाशिक (MH 20 BL 4039) या बसला धडक दिल्याने हा तिहेरी अपघात झाला.

या अपघातात दोन्ही बसचे नुकसान झाले असून, ट्रक जवळील शेतात पलटी झाल्याने ट्रक चे देखील नुकसान झाले आहे.

घटनेची माहिती मिळताच देवळा पोलीस निरीक्षक समीर बारावकर, उप निरीक्षक रमेश पाटील, सहा.पो. उप. निरीक्षक विनय देवरे, पोलीस नाईक सचिन भामरे, यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळावर पोहचताच अपघातग्रस्त वाहने बाजूला करत वाहतूक सुरळीत केली. जखमींना देवळा ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचारासाठी दाखल करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat: अमित शाहांसोबत कॅप्टन खरातचा फोटो व्हायरल; काँग्रेसने उपस्थित केला गंभीर प्रश्न

Latest Marathi News Live Update : गुढीपाडव्या निम्मित कांजूरमार्गमध्ये संस्कृती प्रतिष्ठानच्या वतीने अनोखे प्रदर्शन

राज्यात मोठा निर्णय! जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्ये स्वीकृत सदस्यांच्या प्रवेशाला मंजुरी; सदस्यसंख्या वाढणार, पण किती?

IPL 2026: मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांचा संताप, तिकिटांच्या किमती पाहून चक्रावले; मागील पर्वात ११०० ला मिळणारं तिकिट आता...

Captain Kharat: कॅप्टन खरातचं भलतंच प्रकरण उघडकीस; महिलेचे AI फोटो अन् १८ फेब्रुवारीला गुन्हा...

SCROLL FOR NEXT