Nashik truck fire Accident  Esakal
नाशिक

Nashik News : सिन्नर घोटी महामार्गावर चालत्या ट्रकला आग

सकाळ वृत्तसेवा

सिन्नर : सिन्नर घोटी महामार्गावर घोरवड घाटात मंगळवारी (ता. १०) सकाळी चालत्या ट्रकला अचानक आग लागल्याने महामार्गावर एकच धावपळ उडाली. आग लागल्याने संपूर्ण ट्रक हा काही तासाच्या अवधीतच जळून खाक झाला.

सिन्नर नगर परिषदेच्या अग्निशामक विभागाला लागलीच पाचारण करण्यात आले, यावेळी अग्निशामक कर्मचाऱ्यांनी शर्तीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. तसेच एमआयडीसी अग्निशामक दलाचे कर्मचारी यांनीही आग आटोक्यात आणण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत.

या ट्रकमध्ये प्लॅस्टिक असण्याची शक्यता सांगण्यात येत आहे. आटोक्यात आणण्यासाठी लाला वाल्मिकी, नवनाथ जोंधळे, आकाश देवकर, लक्ष्मण सोनकुसरे, जयेश बोरसे आदींनी प्रयत्न केले. हा ट्रक (क्रमांक एम एच 48 बी एम 16 76( घोटीहून सिन्नरच्या दिशेने जात असल्याचे समजते. ट्रकच्या आगीने क्षणार्धात रुद्र रूप धारण केल्याने संपूर्ण ट्रक जळून खाक झालेला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT