Nashik crime news
Nashik crime news esakal
नाशिक

अवैध मद्यसाठ्यासह ट्रक, 2 कार जप्त; 9 संशयितांना अटक

नरेश हाळणोर

नाशिक : जिल्ह्यातून अवैधरित्या मद्याची वाहतूक (illegal Liquor transport) करताना ट्रकला राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या (state excise department) पथकाने ताब्यात घेतला. ट्रकमध्ये परराज्यात विक्रीसाठी परवानगी असलेला मद्यसाठा होता.

तर या ट्रकच्या पुढे व पाठीमागे संरक्षण देणाऱ्या दोन कारही जप्त करण्यात आल्या असून याप्रकरणी ९ जणांना अटक करण्यात आले आहे. सदरची कारवाई मोहदरी घाटात करण्यात आली आहे. (Truck with illegal liquor 2 cars seized 9 suspects arrested Nashik crime Latest Marathi News)

नरेंद्रसिंग ऊर्फ नरेश राजेंद्रसिंग रोतेला (रा. अहमदनगर), नारायण भगवान गिरी (रा. सातारा), सुनिल रामचंद्र कांबळे (रा. पुणे), अजय सूर्यकांत कवठणकर (रा. सिंधुदुर्ग), रविंद्र दत्तात्रय काशेगावकर(रा. पुणे), जतिन गुरुदास गावडे (रा. सिंधुदुर्ग), सतिष संतोष कळगुटकर(रा. सिंधुदुर्ग), सुभाष सखाराम गोदडे (रा. अहमदनगर) व अशोक बाबासाहेब गाडे(रा. अहमदनगर) अशी संशयित मद्य तस्करांची नावे आहेत.

एक्साइज विभागाने दिलेल्या माहितीनुसार, भरारी पथक एकचे निरीक्षक जयराम जाखरे यांना मद्याची अवैध वाहतुक होत असल्याची खबर मिळाली होती. एक्साईजच्या पथकाने (ता.२३) सिन्नर तालुक्तातील मोहदरी शिवारातील हॉटेल सूर्याच्या बाजूला संशयास्पद वाहनांची तपासणी केली.

त्यावेळी आयशर टेम्पोत (एमएच ४६ एफ २३९८) गोवा राज्यात विक्रीसाठी परवानगी असलेल्या ओल्ड बिल स्पेशल व्हिस्कीच्या ७५० मिलीच्या ३ हजार ६०० सिलबंद बाटल्या (३०० बॉक्स) आढळून आल्या.

दरम्यान, सदरील घटनेची चौकशी करीत असताना, टेम्पोच्या संरक्षणार्थ क्रेटा कार (एमएच ०७ एजी ९१९९) ही मद्यवाहतूक करीत असलेल्या टेम्पोच्या पुढे आणि स्विप्ट डिझायर (एमएच १६ सीव्ही ३१९२) कार ही पाठीमागे चालत होत्या.

याअर्थी या दोन्ही वाहने मद्यवाहतूक करणाऱ्या वाहनाला संरक्षण देत असल्याचे तपासात निष्पन्न झाले. पथकाने या कारवाईत अवैध मद्यसाठा, ट्रक, दोन कार असा 40 लाख 20 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला.

राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त कांतीलाल उमाप, दक्षता पथकाचे संचालक सुनिल चव्हाण, नाशिकचे विभागीय उपायुक्त अर्जुन ओहोळ, जिल्हा अधीक्षक शशिकांत गर्जे व उपअधीक्षक हर्षवर्धन शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पथक एकचे निरीक्षक जयराम जाखर, दुय्यम निरीक्षक जी. पी. साबळे, रोहीत केरीपाळे, यशपाल पाटील, जवान सुनिल दिघोळे, धनराज पवार, राहुल पवार, राजकुमार चव्हाणके, अनिता भांड यांचया पथकाने सदरची कामगिरी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT