sugar factory.jpg 
नाशिक

येत्या हंगामात 'हे' दोन्ही कारखाने सुरु होण्याची शक्यता...कारण

सकाळवृत्तसेवा

नाशिक : (भाऊसाहेबनगर) तालुक्यातील निफाड आणि रानवड साखर कारखाना हे दोन सहकार साखर कारखाने सुरु करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजितपवार यांनी शुक्रवारी (ता.13) सहकार मंत्री, लोकप्रतिनिधींसह मुंबई येथे बैठक घेतली. बैठकीत संबंधितांना यासंबंधी कार्यवाहीच्या सुचना दिल्या आहेत. निफाड आणि रानवड दोन्ही बंद असलेले साखर कारखाने आम्ही सुरु करु असे आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे विधानसभा निवडणुकीदरम्यान दिले होते. 

टॅक्स भरणे आणि पोर्टसाठी जमीन हस्तांतरण याबाबत उचित कार्यवाही

निफाडकरांनी शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात यामुळे राष्ट्रवादीचे दिलीपराव बनकर यांना विजयी केले. नाशिक आणि निफाड साखर कारखाना संदर्भात एक बैठकही मुंबईत झाली. ड्रायपोर्टचे माध्यमातून निफाड सुरु होणे शक्य असतांना तेथील कार्यवाही संथ गतीने सुरु आहे, अशा पार्श्वभूमीवर तालुक्यात अस्वस्थता वाढु लागली होती. रंगपंचमीचे दिवशी अजित पवार, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, विश्वजित कदम यांचेसह आमदार दिलीप बनकर, माणिकराव कोकाटे, पंढरीनाथ थोरे, राजेंद्र डोखळे, सुभाष कराड, सागर कुंदे यांचेसह बैठक घेतली. साखर आयुक्त बाजीराव शिंदे, उपजिल्हाधिकारी सागर, जिल्हा बॅकेचे मुख्याधिकारी खरे, जे.एन.पी.टी.चे अधिकारी ,सहकार आणि वित्त विभागाचे सचिव उपस्थित होते. ड्रायपोर्टसाठी निफाडची जागा खरेदी, निफाड कारखान्यांकडे येणे असलेला शासनाचा सेल्स टॅक्स यासंबंधी चर्चा झाली. टॅक्स भरणे आणि पोर्टसाठी जमीन हस्तांतरण याबाबत उचित कार्यवाही करण्याची सुचना पवार यांनी दिल्या आहेत. 

यासंबंधी एप्रिल महिन्यातील पहिल्या आठवडयात बैठक होणार आहे. राज्यस्तरावर सुरु असलेल्या प्रयत्नातून दोन्ही कारखाने येत्या हंगामात सुरु होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पुढील हंगामात तालुक्यात उसाचा क्षेत्र वाढणारं आहे अशावेळी या प्रयत्नांना वेग यावा अशी उत्पादकांची भावना आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : आषाढी वारीत दुर्दैवी घटना! जेजुरीजवळ ट्रकची वारकऱ्यांना धडक, ३ महिलांचा मृत्यू, ४ गंभीर जखमी

Ashadhi Wari: पंढरपुरात सायकलवारीचा जल्लोष! महाराष्ट्र-कर्नाटकातील ४ हजार सायकलस्वारांची हरिनामाच्या गजरात नगरप्रदक्षिणा

Nagpur: विक्रेत्याच्या चुकीची शिक्षा आता खरेदीदाराला नाही; जीएसटीच्या नियमांमध्ये होणार बदल

Latest Marathi News Live Update : जेजुरीत भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत तीन वारकऱ्यांचा मृत्यू, सहा वारकरी जखमी

Petrol-Diesel Price Today: अमेरिका-इराण संघर्षानंतर देशात इंधनाचे नवे दर जाहीर! 13 जुलैला पेट्रोल-डिझेल किती रुपयांना?

SCROLL FOR NEXT