नाशिक

नांदूरमधमेश्‍वरला ‘विलोभनीय बदकांचा राजपुत्र’

CD
फोटो : H35159 नांदूरमध्यमेश्‍वरला ‘विलोभनीय बदकांचा राजपुत्र’ अभयारण्य बनले हजारो स्थलांतरित पक्ष्यांचे आश्रयस्थान सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. १६ : सध्या नांदूरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्य स्थलांतरित पक्ष्यांच्या आगमनाने गजबजले आहे. हिवाळ्यात हजारो स्थलांतरित पक्ष्यांचे आश्रयस्थान ठरणाऱ्या या ठिकाणी जैवविविधतेचे जतन करण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. येथे रोजच नवनवीन पक्षी येत असून, पक्षी अभ्यासक व प्रेमी शेकडोंच्या संख्येने येथे येत आहेत. सध्या येथे ‘टफ्टेड डक’ म्हणजेच विलोभनीय बदकांचा राजपुत्र म्हणवला जाणारा पक्षी आला असून, आता काही महिने तो येथे मुक्कामी राहणार आहे. दूर युरोपातील सायबेरिया अन् आइसलँडच्या गोठलेल्या प्रदेशातून हजारो मैलांचा खडतर प्रवास करत हा बदक नांदूरमध्यमेश्वरच्या पाणथळ क्षेत्रावर दर वर्षी हजेरी लावतो. हा ‘टफ्टेड डक’ काळ्या रंगाचा असतो. चकाकणाऱ्या गडद काळ्या पंखांची शान त्यावर लख्ख सोनेरी डोळ्याची ठेवण आणि डोक्यावर हवेत मुकुटासारखा डोलणारा मोहक तुरा या पक्ष्याचे सौंदर्य अधिकच वाढवतो. इतर साध्या बदकांसारखा हा फक्त पाण्यावर तरंगत नाही, तर पाण्याच्या तळाशी डुबक्या मारून शंख-शिंपले शोधण्यात पटाईत असतो. अंधूक प्रकाशातही लख्ख चमकणारे त्याचे सोनेरी-पिवळे डोळे आणि धोका जाणवताच पाण्याखाली अचानक अदृश्य होऊन दूर मान वर करण्याचा त्याचा खेळ थक्क करणारा आहे. याला प्रत्यक्ष बघितल्यावर निसर्गाचा हा जादूगार मनाला भुरळ घालतो. विद्यार्थी, शिक्षक, पक्षी अभ्यासक, स्वयंसेवी संस्था आणि नागरिकांनी नांदूमध्यमेश्‍वरला भेट द्यावी, सहभागी व्हावे, असे आवाहन वन्यजीव विभागाने केले आहे. कोट ‘टफ्टेड डक’ म्हणजेच एक विलोभनीय बदकांचा राजपुत्रच. इतर साध्या बदकांसारखा हा फक्त पाण्यावर तरंगत नाही, तर पाण्याच्या तळाशी डुबक्या मारून शंख-शिंपले शोधण्यात पटाईत असतो. नांदूरमध्यमेश्‍वर पाणथळावर असे अनेक पक्षी आले आहेत. -हिरालाल चौधरी, वनपरिक्षेत्र अधिकारी, नांदूरमध्यमेश्वर वन्यजीव अभयारण्य

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

धुळे-सोलापूर राष्ट्रीय महागमार्ग धाराशिवमध्ये रोखला! सोलापूरमध्ये राजू शेट्टींची जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक; आता मोर्चा बारामतीकडे...

Syed Mushtaq Ali Trophy: सूर्यकुमारचं वादळ पुन्हा घोंगावलं! ९ चौकार अन् ७ षटकारांसह अर्धशतक करत मुंबईला मिळून दिला मोठा विजय

Latest Marathi News Update : चंद्रपूर जिल्ह्यात बसला भूकंपाचा सौम्य धक्का; ३.२ रिश्टर स्केल तीव्रतेची नोंद, कुरली गावाजवळ होता केंद्रबिंदू

Supreme Court: सुनावणीपूर्वी इंडिया आघाडीची आक्रमक खेळी; मुख्य निवडणूक आयुक्तांना 48 प्रश्न विचारण्याची मागितली परवानगी

Spine Surgery: जन्माची वाट न पाहता आईच्या गर्भातच बाळावर यशस्वी शस्त्रक्रिया; AIIMSच्या डॉक्टरांनी रचला इतिहास

SCROLL FOR NEXT