फोटो : H34614
‘तुझ्याच साठी’ म्युझिक
अल्बम प्रेक्षकांच्या भेटीला
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. ६ : नव्वदच्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्री भाग्यश्री आणि नाशिकचे युवा उद्योजक व अभिनेते संदीप सोनवणे यांचा ‘तुझ्याच साठी’ हा मराठी म्युझिक अल्बम प्रेक्षकांच्या भेटीला आला असून, या सुमधुर गाण्याने अल्पावधीतच संगीतप्रेमींच्या मनात विशेष स्थान निर्माण केले आहे. अवघ्या पाच दिवसांतच या गाण्याने १० लाखांहून अधिक (१ मिलियन) व्ह्यूजचा टप्पा पार केला आहे.
‘मैंने प्यार किया’ फेम अभिनेत्री भाग्यश्री यांनी या म्युझिक अल्बमच्या निमित्ताने मराठी संगीत विश्वात पदार्पण केले आहे. त्यांच्यासोबत या अल्बममध्ये नाशिकचे युवा उद्योजक संदीप सोनवणे यांनी मुख्य भूमिकेतून अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवले आहे. या गाण्याच्या यशात पार्श्वगायिका आर्या आंबेकर यांचा भावपूर्ण स्वर आणि मिताली लिमये यांचे सुरेख गीतलेखन यांचाही मोलाचा वाटा आहे. ‘तुझ्याच साठी’ ही एक अतिशय हळुवार आणि सुंदर प्रेमकथा आहे. या अल्बममधील भाग्यश्री आणि संदीप सोनवणे यांची नवी जोडी आणि त्यांची ऑन-स्क्रीन केमिस्ट्री सध्या प्रेक्षकांचे विशेष लक्ष वेधून घेत आहे. हा म्युझिक अल्बम २६ ऑक्टोबरला टी-सिरीज मराठीच्या अधिकृत यू- ट्यूब चॅनेलवर प्रदर्शित करण्यात आला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.