Tukdoji Maharaj Swachh Gram Competition first place to Shirsane and Boradi from division nashik news esakal
नाशिक

Gram Swachhata Abhiyan : तुकडोजी महाराज स्वच्छग्राम स्पर्धेत विभागातून शिरसाणे अन बोराडीला प्रथम क्रमांक

सकाळ वृत्तसेवा

Gram Swachhata Abhiyan : संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानांतर्गतच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छग्राम स्पर्धेत २०१९-२० मधील विभागस्तरावर शिरसाणे (ता. चांदवड, जि. नाशिक), तर २०२०-२१ आणि २०२१-२२ मध्ये बोराडी (ता. शिरपूर, जि. धुळे) ग्रामपंचायतीने प्रत्येकी दहा लाख रुपयांचे प्रथम पारितोषिक पटकावले.

बुधवारी (ता. २०) विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या हस्ते स्पर्धेतील विजेत्या ग्रामपंचायतींना पारितोषिके प्रदान करण्यात आली.

नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, विकास उपायुक्त उज्ज्वला बावके, विकास सहाय्यक आयुक्त मनोजकुमार चौधरी आदी उपस्थित होते. (Tukdoji Maharaj Swachh Gram Competition first place to Shirsane and Boradi from division nashik news)

कोरोना कालावधी असल्याने २०२०-२१ आणि २०२१-२२ साठी एकत्र स्पर्धा झाली. श्री. गमे म्हणाले, की संत गाडगेबाबा सामान्य लोकांत काम करणारे संत होते. त्यांनी आयुष्यभर स्वच्छतेचा जप केला. स्वच्छतेबाबत त्यांनी महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात जनजागृती केली.

महाराष्ट्रातील संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानावरून देशात स्वच्छ भारत अभियानाची सुरवात झाली. त्याचबरोबर रोजगार हमी योजना आणि इतरही अशा अनेक योजना आहेत, ज्या महाराष्ट्रात सुरू झाल्या आणि आता त्या देशात राबविण्यात येत आहेत. आता स्वच्छता अभियानात सातत्य राखणे आवश्‍यक आहे.

संत गाडगेबाबांच्या स्वच्छतेच्या संदेशाचे सर्वांनी पालन करावे आणि प्रत्येकाने आपला गाव, परिसर शहर स्वच्छ ठेवावा, असे मित्तल यांनी सांगितले. श्री. चौधरी यांनी प्रास्ताविक केले. माधुरी देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले. अनिल राणे यांनी आभार मानले.

(लोकल ते ग्लोबल लेटेस्ट अपडेट मिळवा सकाळच्या व्हॉट्सअप चॅनेलवर फक्त एका क्लिकमध्ये)

स्पर्धेतील इतर विजेत्या ग्रामपंचायतींची नावे आणि पारितोषिकांची रक्कम रुपयांमध्ये अशी : २०१९-२० चे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छग्राम : द्वितीय- थेरगाव (जि. नगर) (८ लाख), तृतीय- विभागून श्रीरामपूर (जि. नंदुरबार) आणि सावखेडे खुर्द (जि. जळगाव) (सहा लाख). विशेष पुरस्कार : सांडपाणी व्यवस्थापनाचा (कै.)

वसंतराव नाईक पुरस्कार- प्रथम- श्रीरामपूर (जि. नंदुरबार), पाणी गुणवत्ता व व्यवस्थापनाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार- गोंडेगाव (ता. दिंडोरी, जि. नाशिक), शौचालय व्यवस्थापनाचा (कै.) आबासाहेब खेडकर पुरस्कार- सावखेडे खुर्द (जि. जळगाव). प्रत्येक ग्रामपंचायतीला ३० हजार रुपये.

दोन वर्षांच्या एकत्रित पुरस्कारार्थी ग्रामपंचायती

(पारितोषिकांची रक्कम रुपयांमध्ये)

० राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छग्राम :

- द्वितीय : श्रीरामपूर (जि. नंदुरबार) (आठ लाख)

- तृतीय : गणेगाव (ता. राहुरी) (सहा लाख)

० विशेष पुरस्कार : प्रत्येकी ३० लाख

- सांडपाणी व्यवस्थापनाचा (कै.) वसंतराव नाईक पुरस्कार- पिंपळगाव बसवंत (जि. नाशिक)

- पाणी गुणवत्ता व व्यवस्थापनाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार- पिंपळगाव बसवंत (जि. नाशिक)

- शौचालय व्यवस्थापनाचा (कै.) आबासाहेब खेडकर पुरस्कार- कोंभळी (जि. नगर)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur : शेतकऱ्यानं म्हशी घ्यायला ७ लाख साठवले, सहावीत शिकणाऱ्या लेकानं गेमवर ५ लाख उडवले; बँक स्टेटमेंट बघून बसला धक्का

Zodiac Prediction 7 to 13 July: या आठवड्यात कोणत्या राशींना होणार आर्थिक लाभ अन् नोकरी व्यवसायत मिळेल उत्तम संधी, वाचा साप्ताहिक राशिभविष्य

Latest Maharashtra News Updates : मुंबईत वाहतूक ठप्प! मोनो रेल सेवा बंद, मेट्रोमध्ये तांत्रिक बिघाडाने प्रवाशांचे हाल

Global Club Championship: पाकिस्तानला डावलण्याची शक्यता; जागतिक क्लब अजिंक्यपद स्पर्धा : पाच संघांचा सहभाग

CA Result Success Story: रोज आठ ते दहा अभ्यासात जीव ओतून जिद्द व चिकाटीच्या जोरावर गेवराईच्या पृथ्वीराजचे 'सीए'परीक्षेत यश

SCROLL FOR NEXT