Turnover of crores stalled due to cancellation of Chandanpuri Yatra 
नाशिक

चंदनपुरी यात्रोत्सव रद्द झाल्याने कोट्यवधींची उलाढाल ठप्प! ग्रामीण अर्थकारणावरही परिणाम 

प्रमोद सावंत

मालेगाव (जि. नाशिक) : उत्तर महाराष्ट्रात सारंगखेडा येथील दत्त जयंतीनिमित्त होणारा चेतक महोत्सव व या यात्रोत्सवापाठोपाठ खंडोबा महाराजांचा चंदनपुरी येथील यात्रोत्सव सर्वांत मोठा मानला जातो. मात्र कोरोनाच्या संकटामुळे यंदा यात्र रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

या यात्रेला कसमादेसह उत्तर महाराष्ट्रातील भाविक हजेरी लावतात. यात्रेत लहान-मोठी सुमारे अडीचशेहून अधिक दुकाने थाटतात. अनेकांना रोजगार उपलब्ध होतो. ग्रामपंचायतीला सुमारे तीन लाखांचे व देवस्थान ट्रस्टलाही मोठे उत्पन्न मिळते. पौष पौर्णिमेपासून सुरू होणारा यंदाचा यात्रोत्सव कोरोनामुळे रद्द झाल्याने कोट्यवधीच्या उलाढालीला मुकावे लागले आहे. जानेवारीअखेर व फेब्रुवारीच्या सुरवातीचा असे सलग दोन रविवार एकादशी आल्याने दिवट्या-बुधल्या, जागरण गोंधळ या कार्यक्रमांनाही आळा बसला. 

ग्रामीण अर्थकारणावर परिणाम

कसमादेतील चंदनपुरी, देवमामलेदार व नामपूर येथील यात्रोत्सव प्रसिद्ध आहे. या यात्रांमुळे ग्रामीण भागातील लहान-मोठ्या व्यावसायिकांना मोठा आधार मिळतो. यात्रेतील उलाढाल व उत्पन्न यात त्यांना मोठी संधी असते. त्यासाठी किमान तीन महिने अगोदर नियोजन सुरू असते. यात्राकाळात खाद्यपदार्थ, खेळणी, भांडी, मसाला, शोभेच्या वस्तू, सौंदर्यप्रसाधने, प्रसाद, श्रीफळ, हळद-कुंकू, भंडारा यातून मोठी उलाढाल होते. हॉटेल व्यावसायिकांना ही पर्वणी असते. किमान पन्नास मोठी हॉटेल्स चंदनपुरी यात्रोत्सवात थाटली जातात. जागामालक व परिसरातील शेतकऱ्यांना भाड्यापोटी लाखोंची रक्कम मिळते. यात्रेत किमान दोन प्रसिद्ध तमाशे येतात. लघुव्यावसायिकांना यात्रोत्सव व्यवसायासाठी बळ देतो. पर्यायाने होलसेल व ठोक विक्रेत्यांचीही विक्री वाढते. याशिवाय विविध राज्यांतील मौत का कुवा, जादूगर, पाळणे आदीही येथे दाखल होतात. यात्रोत्सव काळात प्रत्येक व्यावसायिकाला तीन आठवड्यांच्या कालावधीत सरासरी दोन ते तीन लाख रुपये उत्पन्न मिळते. व्यावसायिकांच्याच सुमारे ५० ते ६० लाखांच्या उत्पन्नावर गदा आली. येथे कोटम भरणे, नवस फेडणे यांसह विविध कार्यक्रम होतात. या काळात चिकन-मटणाची विक्रमी विक्री होते. या सर्व उलाढालीला लगाम लागल्याने ग्रामीण अर्थकारणावरही त्याचा काहीअंशी परिणाम झाला आहे. 

यात्रोत्सवाचा रंग फिका 

यात्रोत्सवात तळी भरणे, कोटम भरणे, देव भेटविणे, काठ्या मिरविणे, नवस फेडणे यांसह विविध धार्मिक कार्यक्रम होतात. वाघ्या मुरळींना या माध्यमातून मोठा रोजगार व उत्पन्न मिळते. यात्रोत्सव रद्द झाला असला तरी, धार्मिक कार्यक्रम टप्प्याटप्प्याने सुरू आहेत. यामुळे वाघ्या मुरळी, गोंधळींना उत्पन्न मिळत असले तरी खाद्यपदार्थ, खेळणी, पाळणे, तमाशा व मनोरंजनाची साधने नसल्याने यात्रोत्सवाची रंगत जाणवत नाही. २४ जानेवारी व ७ फेब्रुवारी असे सलग दोन रविवार एकादशी आल्याने अनेकांना मांसाहारी नैवेद्य दाखवत कोटम भरता आला नाही. त्यामुळे १४ फेब्रुवारीला चंदनपुरीत गर्दीचा महापूर होता. पौष पौर्णिमेला यात्रोत्सवाच्या दिवशी व रविवारमुळे यात्रोत्सवासारखीच गर्दी, वाहतूक कोंडी झाली होती.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

केंद्रातील मंत्र्यांचं 'मुंबई'बाबात धक्कादायक विधान, राज ठाकरे संतापले! मोदी सरकाचे मंत्री असं काय म्हणाले?

Pune Weather Update : पुण्यात थंडीची लाट ओसरली! किमान तापमान 15 ते 20 अंशावर स्थिर; पुढील दोन दिवस हवामान निरभ्र राहणार

Latest Marathi News Live Update : भाजप आमदार अत्याचार करत आहेत, शिवसेना आमदाराचे धक्कादायक विधान

Pune Accident: पुण्यात अपघातांची मालिका थांबेना... गरवारे कॉलेज चौकात मध्यरात्री भीषण धडक; तीन जण गंभीर जखमी

माेठी बातमी! 'नांदणीजवळील महाराजा ऑर्केस्ट्रा बारवर छापा'; २६.५० लाखांचा मुद्देमाल जप्त, रात्री दीड वाजता काय घडलं!

SCROLL FOR NEXT