crime news esakal
नाशिक

Nashik Crime News : चारचाकीमधील अडीच लाख रुपये लांबविले

सकाळ वृत्तसेवा

मालेगाव : शहरासह तालुक्यात रस्ता लुटीचे प्रकार सातत्याने होत आहेत. विविध राज्य रस्ते व महामार्गावर होणारी मोबाईलची लूट पोलिसांसाठी डोकेदुखी ठरली असतानाच तालुक्यातील गिगाव शिवारात गिगाव-सिताणे रस्त्यावर चोरट्यांनी चारचाकीमधून सुमारे अडीच लाख रुपये लंपास केल्याने खळबळ उडाली आहे.

गिगाव-सिताणे रस्त्याने सुरेश रामदास जाधव (वय ३४, रा. सिताणे, ता. मालेगाव) हे स्विफ्ट कारने (एमएच ०३ एआर ९००७) सिताणेकडे जात होते. त्याचवेळी दुचाकीवरून आलेल्या तीन संशयित यांनी दुचाकी कारजवळ नेत काचा फोडल्या.

यावेळी कारचालक तरुण व संशयितांमध्ये झटापट झाली. संशयितांनी सुरेश यांना मारहाण करत गाडीत ठेवलेली २ लाख ४० हजार रुपयांची बॅग हिसकावून नेली. २० मार्चला रात्री हा प्रकार घडला.

हेही वाचा: एका मुलाखतीतून उलगडलेले भैरप्पा!

रस्ता लुटीच्या घटना दिवसेंदिवस वाढत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. मोबाईल, सोने, पाठोपाठ रोख लूट करण्याचा प्रकार घडल्याने संशयितांचा तपास पोलिसांना आवाहन ठरणार आहे.

घटनेची माहिती मिळताच उपअधिक्षक पुष्कराज सूर्यवंशी, सहाय्यक निरीक्षक हेमंत पाटील व सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पहाणी केली. श्री. जाधव यांच्या तक्रारीवरून तालुका पोलिस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

Samarth Movie Review: मनाचे श्लोक, अध्यात्म अन् बाप-लेकाचा संघर्ष; विचार करायला लावणारा 'समर्थ'; कसा आहे चित्रपट?

SCROLL FOR NEXT