A forest department team at Sinnar with suspected poachers esakal
नाशिक

Nashik Crime : जंगली श्वापदांची शिकार करणाऱ्या दोघांना अटक

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime : जंगली श्वापदांची शिकार करणाऱ्या दोघा संशयितांना वनविभागाच्या सिन्नर येथील पथकाने मृत श्वापदे व शिकारीच्या साहित्यासह रंगेहाथ पकडले. या दोघांकडे उदमांजर आणि कोल्ह्याचे मृतदेह आढळून आले.

भारतीय वन कायद्यानुसार या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून सिन्नर न्यायालयाने या दोघांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. (Two arrested for hunting wild animals Nashik Crime)

देवपूर शिवारातील जंगलात शिकार केली जात असल्याची माहिती सिन्नरच्या वनपरिक्षेत्र अधिकारी मनीषा जाधव यांना मिळाली होती.

त्यानुसार श्रीमती जाधव यांनी वनपाल सुजित बोकडे, वत्सला कांगणे, अनिल साळवे, आकाश रुपवते, चंद्रमणी तांबे, बालम शेख, रामनाथ सहाणे, पोपट बिन्नर, रोहित लोणारे यांच्या पथकाला सोबत घेत देवपूर शिवारातील मानमोडा परिसरात सापळा रचला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

वनविभागाच्या पथकाने रिक्षा (एमएच १५ झेड- २२०३) ची झडती घेतली असता कोल्हा व उदमांजर यांची शिकार केल्याचे आढळून आले. पथकाने दोन्ही श्वापदांचे मृतदेह ताब्यात घेतले. संशयित विशाल शामराव पवार (२३) व छबू गंगाराम बोडके (६५, दोघे रा. वैदूवाडी (सिन्नर) यांना रिक्षासह ताब्यात घेतले.

त्यांच्याकडून शिकारीचे साहित्यही ताब्यात घेण्यात आले. या दोघांवर वनजीव संरक्षण अनुसूची-१ नुसार कारवाई करण्यात आल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी मनीषा जाधव यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flood : नेपाळ-तिबेट सीमेवर जलप्रलयाचा थरार! महाभयंकर विनाशादरम्यान आतापर्यंत काय-काय घडलं? जाणून घ्या

४३ वर्षांनंतर ‘मासूम’ची नवी कहाणी; ए. आर. रहमान यांनी रेकॉर्ड केली 3 गाणी

गोकुळ निवडणुकीत मोठा ट्विस्ट! सतेज पाटील थेट भाजप जिल्हाध्यक्षांच्या घरी; नवं समीकरण?

Ichalkaranji Child Death : दूध पिताना चिमुकल्याला ठसका लागून श्वास कोंडला अन्..., इचलकरंजीमध्ये काळीज पिळवटून टाकणारी घटना

Marathi News Live Updates : नागपूरचे 106 जण अडकले नेपाळमध्ये; सर्वजण सुरक्षित; आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली महत्त्वाची अपडेट

SCROLL FOR NEXT