Crime News
Crime News esakal
नाशिक

Nashik Crime News : सातपुरातील गोळीबार प्रकरणी दोघांना अटक

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : सातपूर औद्योगिक वसाहतीमध्ये आठवडाभरापूर्वी झालेल्या गोळीबार प्रकरणी शहर गुन्हे शाखेच्या पथकाने दोघांना अटक केली आहे. दोन्ही संशयितांनी मुख्य सूत्रधारांना जखमी व फिर्यादीच्या हालचालींची माहिती दिली होती. या दोघांना तीन दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे. (Two arrested in Satpur firing case Nashik Crime News)

हेही वाचा : एका मुलाखतीतून उलगडलेले भैरप्पा!

सातपूर एमआयडीसीतील कार्बननाका परिसरात १९ मार्चला कारने पाठलाग करत तपन जाधव व राहुल पवार यांच्या कारला धडक देऊन त्यांच्यावर गोळीबार केला होता. यात जाधव जखमी झाले होते तर राहुल पवार हल्लेखोरांपासून बचावला होता.

पवार यांच्या फिर्यादीनुसार आशिष राजेंद्र जाधव, चेतन अशोक इंगळे, अक्षय उत्तम भारती, गणेश राजेंद्र जाधव, किरण चौधरी यांच्याविरोधात प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा सातपूर पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. संशयित सराईत गुन्हेगार आहेत, तर हा हल्ला पूर्ववैमनस्यातून झाला होता असे तपासात समोर आले आहे.

अटक केलेल्या दोघांनी मुख्य संशयितांना जाधव व पवार यांच्या हालचालींची माहिती पुरविली होती. त्यानुसारच संशयितांनी दोघांवर हल्ला केल्याचे तपासात समोर येत आहे. या गुन्ह्याचा तपास सातपूर पोलिस स्टेशनसह शहर गुन्हे शाखेचे युनिट १ करीत आहे. संशयितांच्या शोधासाठी पोलिसांची विविध पथके तपास करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Narendra Modi : पंतप्रधान मोदी अन् राज ठाकरे एकाच मंचावर; 17 मे रोजी सभा

KL Rahul: 'हा काय वनडे-टी20 खेळणार, त्याच्याकडे स्ट्रेंथच नाही...', केएल राहुलने सांगितली ती आठवण

Covishield : सीरमने २०२१ मध्येच थांबवले कोव्हिशिल्डचे उत्पादन

Gargai Dam Project : गारगाई प्रकल्पाला येणार वेग; मुंबईला मिळणार ४०० दशलक्ष लिटर पाणी

PSL vs IPL : पाकिस्तान करणार धरमशालाची कॉपी; PSL ला IPL सारखी झळाळी देण्यासाठी सुरू केली धडपड

SCROLL FOR NEXT