Nashik Crime News: कोयता गँगची बेकरी चालकाला मारहाण

Crime News
Crime NewsSakal

सातपूर : शिवाजी नगर भागात कार्बननाका परिसरातील अभिषेक बेकरीत एकाने केक घेत पैसे न देण्याच्या कारणावरून बेकरी चालकांशी हुज्जत घालत वादावादी केली. नंतर टोळक्यांना बोलावून बेकरी चालकावर व बेकरीतील कामगारांना धमकावून कोयत्याचा वार करण्याचा प्रयत्न केला.

Crime News
Nashik Crime News : प्रेमसंबंधातून प्रियकराकडून पतीचा खून; 8 तासातच गुन्ह्याची उकल

ही घटना शनिवारी (ता. २५) रात्री नऊच्या सुमारास घडली. हा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. या प्रकरणी अभिषेक बेकरीचे संचालक अनिकेत सुरेश जाधव यांनी सातपूर पोलिसात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी सहा जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

Crime News
Breaking News: सातपूर परिसरात तरुणावर गोळीबार करत जिवघेणा हल्ला; नागरिकांमध्ये दहशत

या घटनेप्रकरणी सातपूर पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतले असून पुढील तपास सातपूर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. आहेर हे करीत आहेत. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

Crime News
Nashik Crime News : शाळा महाविद्यालयाच्या कॅम्पसमध्ये राडा; विद्यार्थ्यांवर हत्याराने वार

या प्रकरणी शुभम अरुण पवार, हेमंत अरुण गाडेकर, मुकेश दिलीप कुंभार, सागर सुरेश गायकवाड, नयन विठ्ठल गवई, पंकज ऊर्फ निक्की क्षीरसागर या संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. अशी माहिती सातपूर पोलिस ठाण्यातील वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेंद्र चव्हाण यांनी दिली आहे.

Crime News
Pune Crime: महिलांनी मारलं म्हणून अपमान झाला अन् "त्याने" खाणीत उडी मारून दिला जीव

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com