Jailed
Jailed esakal
नाशिक

Nashik Bribe Crime : सहकार विभागातील दोघे लाचखोर कारागृहात

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : क्रेडीट सोसायटीच्या नियमानुसार कर्ज न भरलेल्या सभासदाचे घर लिलाव विक्रीच्या आदेशाविरोधात दाखल याचिकेचा निकाल तक्रारदाराच्या बाजूने देण्याच्या मोबदल्यात ५ लाख रुपयांची लाच मागणाऱ्या सहकार विभागातील दोघांची न्यायालयाने नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात रवानगी केली आहे.

दोघांविरोधात मुंबईनाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येऊन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली होती. (Two bribe takers in cooperative department in jail Nashik Crime)

सहकार अधिकारी भिमराव उर्फ भुषण यशवंत जाधव (४५) व सहायक सहकार अधिकारी अनिल नथुजी घरडे (५२)अशी दोघा लाचखोर अधिकाऱ्यांची नावे आहेत. लाचखोरांनी गेल्या ७ ते ८ डिसेंबर दरम्यान तक्रारदाराकडे लाचेची मागणी केली होती.

तक्रारदार हे क्रेडीट सोसायटीचे लिपीक आहेत. सोसायटी नियमानुसार सभासदांनी कर्ज न भरल्यास त्याच्या घराचा लिलाव केला जातो.

या लिलाव विक्रीचा आदेशाविरोधात तक्रारदाराने विभागीय सहनिंबधक कार्यालयात अर्ज केला असता, तक्रारदाराच्या बाजूने निकाल देण्याच्या मोबदल्यात सहकार अधिकारी भिमराव जाधव, सहायक सहकार अधिकारी अनिल घरडे यांनी सहा लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.

याबाबत तक्रारदाराने दोघांची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला असता पंचासमोर दोघा संशयितांनी तडजोडीअंती ५ लाख रुपयांची लाच मागितली.

त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी (ता.३१) रात्री मुंबईनाका पोलिस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दोघांना अटक करून न्यायालयात गुरुवारी (ता.१) हजर केले असता न्यायालयाने दोघांनाही न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

त्यामुळे त्यांची रवानगी नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी पोलिस निरीक्षक नीलिमा डोळस, कर्मचारी संदीप हांडगे, सुरेश चव्हाण यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain Updates : पुण्यात पावसाचा उद्रेक! कुठे झाडं कोसळली, कुठे पत्रे उडाले तर अनेक रस्त्यांवर पाणीच पाणी

Pune Porsche Crash : कल्याणीनगर अपघातापूर्वी अन् नंतर नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण घटनाक्रम

Mumbai Lok Saha Election : मुंबईत अनेक ठिकाणी संथगतीने मतदान! कळवा-मुंब्र्यात अनेकजण मतदान न करताच परतले

Lok Sabha Election: कल्याण पश्चिम, भिवंडी मतदारसंघात निवडणूक आयोगाचा सावळा गोंधळ; मतदार यादीतून हजारो नागरिकांची नावं गायब

'शरद पवारांनी भाजपला पाठिंबा दिला होता, ती जर सुपारी होती तर आमचीही..'; आव्हाड, राऊतांच्या टीकेला मनसे आमदाराचं प्रत्युत्तर

SCROLL FOR NEXT