Accident sakal
नाशिक

लहान्याची दारू सोडवण्यासाठी गेलेल्या भावंडाना वाहनाने चिरडले

विजय पगारे

इगतपुरी (जि. नाशिक) : तालुक्यातील मुरंबी येथील दोन सख्खे भाऊ नाशिकच्या पांडव लेणीजवळ शुक्रवारी (ता. १७) सकाळी अकराच्या सुमारास झालेल्या अपघातात जागीच ठार झाले. लहान भावाची दारू सोडविण्यासाठी जाऊन परतत असताना, अनोळखी वाहनाने चिरडल्याने दोघांचा हृदयद्रावक मृत्यू झाला.

मुरंबी (ता. इगतपुरी) येथील गोरख लक्ष्मण जाधव (वय ३५) लहान भाऊ सोमनाथ जाधव (२५) याची दारू सोडविण्यासाठी शुक्रवारी सकाळी दोघे वणी येथे गेले होते. तिकडून दुचाकी (एमएच १५, डीपी ४२१४)वरून मुरंबीकडे परतत होते. सकाळी अकराच्या सुमारास मुंबई- आग्रा महामार्गावरील पांडव लेणीसमोर उड्डाणपुलावर त्यांच्या दुचाकीला अनोळखी वाहनाने धडक दिली. या अपघातात दोघांना वाहनाने चिरडल्याने ते जागीच ठार झाले. अपघातात मृत झालेल्या दोन्ही भावांमागे आई, वडील, दोघांच्या पत्नी, दोन मुली व बहीण असा परिवार आहे. या प्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात अज्ञात वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक कुमार चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक उत्तम सोनवणे तपास करीत आहेत. दरम्यान, या घटनेमुळे इगतपुरी तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 CSK vs RR : MS Dhoni च्या जागी कुणाला मिळणार Playing XI मध्ये संधी? 'या' २० वर्षीय खेळाडूचं नाव चर्चेत...

Kolhapur - Navi Mumbai Filght : कोल्हापूरच्या हवाई सेवेत नवा अध्याय; नवी मुंबईसाठी थेट उड्डाण सुरू

Jyotiba Chaitra Yatra 2026 : कामदा एकादशीच्या मुहूर्तावर चैत्र यात्रा सुरू; गुलाल-खोबऱ्याची उधळण, सीमाभागासह राज्यभरातील भाविक दाखल

UP industry Policy: UP मध्ये आता लायसन्स राज संपणार! छोट्या उद्योगांना योगी सरकारची मोठी भेट; 'या' सुविधेमुळे ५ वर्षे तपासणीतून मुक्ती

Dattatray Bharane : 'भोंदूबाबा-महाराज हे सगळं झूट, पोरांनो त्यांच्या नादाला अजिबात लागू नका'; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांचा सल्ला

SCROLL FOR NEXT