Crime esakal
नाशिक

Nashik Crime: अट्टल दोघा घरफोड्यांना अटक; युनिट एकची कामगिरी

विशाल संजय कंक (२३, रा. खालचे चुंचाळे, अंबड), दीपक शाम वाघारे (२३, रा. गंगापूरगाव) अशी दोघा संशयित घरफोड्यांची नावे आहेत.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : पेठे शाळेच्या पाठीमागील दुकानाचे शटर उचकटून रोकड व मोबाईल चोरी करणाऱ्या दोघा घरफोड्यांना शहर गुन्हेशाखेच्या युनिट एकच्या पथकाने सापळा रचून अटक केली आहे.

संशयितांकडून आणखीही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. (two burglars arrested Performance of Unit One Nashik Crime)

विशाल संजय कंक (२३, रा. खालचे चुंचाळे, अंबड), दीपक शाम वाघारे (२३, रा. गंगापूरगाव) अशी दोघा संशयित घरफोड्यांची नावे आहेत.

गेल्या सोमवारी (ता.२२) मध्यरात्री चोरट्यांनी पेठेशाळेच्या मागे असलेल्या गुरुचार्य सुगंधालय अगरबत्ती या दुकानाचे शटर उचकटून रोकड व मोबाईल चोरून नेत घरफोडी केली होती. याप्रकरणी सरकारवाडा पोलिसात गुन्हा दाखल आहे.

सदरील गुन्ह्याचा समांतर तपास शहर गुन्हेशाखेचे युनिट एकचे पथक करीत होते. हवालदार रमेश कोळी यांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत संशयिताचा माग काढला.

त्यावेळी संशयित हे घारपुरे घाट परिसरात येणार असल्याची खबर मिळाली होती. त्यानुसार पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, वसंत पांडव, रमेश कोळी, धनंजय शिंदे, जगेश्वर बोरसे, अमोल कोष्ठी, अप्पा पानवळ, राजेश राठोड यांनी सिद्धेश्वर मंदिराजवळ सापळा रचून दोघा संशयितांना शिताफीने अटक केली.

चौकशीत संशयितांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्याकडून १३ हजारांचे दोन मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. संशयित विशाल कंक याच्याविरोधात सातपूर पोलिसातही चोरीचा गुन्हा दाखल असून, त्यांच्याकडून आणखीही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ethiopia Volcano Ash : मुंबई अन् दिल्लीपर्यंत पोहोचली इथोपियातील ज्वालामुखीची राख; अनेक विमानांची उड्डाणे रद्द, अलर्ट जारी

Latest Marathi News Live Update : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज अमरावती दौऱ्यावर

Maharashtra Local Body Elections : स्थानिक निवडणुकांबाबत आज सर्वोच्च' फैसला, राजकीय पक्षांची धाकधूक वाढली!

Pune Voter List: मतदार यादी दुरुस्तीनंतरच निवडणूक घ्या; सर्वपक्षीय शिष्टमंडळाची पुणे महापालिका प्रशासनाकडे मागणी

सोलापूरची ७२ चितळं विसावली सह्याद्रीत ! ; व्याघ्र प्रकल्पाला गती देण्यासाठी वन विभागाचे मोठे पाऊल..

SCROLL FOR NEXT