Accident News
Accident News esakal
नाशिक

Nashik Crime : बेशिस्त वाहनचालकांमुळे गेला दोघांचा बळी; सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल

नरेश हाळणोर

नाशिक : वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात सातत्याने वाहतूक पोलिसांकडूक कारवाईचा बडगा उगारला जात असतानाही शहर हद्दीमध्ये अपघातांच्या घटना कमी होताना दिसत नाहीत. आठवडाभरात बेशिस्त वाहनचालकांमध्ये एका वृद्धेसह युवकाला आपला जीव हकनाक गमवावा लागला आहे.

याप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये वाहनचालकांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, या घटनांमधून शहरात वाहनचालकांची बेशिस्ती कायम असल्याचेच अधोरेखित झाले आहे. (Two killed due to reckless drivers case of culpable homicide registered Nashik Latest Crime News)

गेल्या रविवारी (ता. १३) रात्री अकरा वाजेच्या सुमारास अजय कैलास ढगे (२९, रा. श्री तुलसी हाईटस्‌, रामकृष्णनगर, मखमलाबाद रोड, पंचवटी) हा युवक ॲक्टिवावरून (एमएच १५ एचएन ३९७३) गंगापूर रोडने येत असताना मल्हारखान झोपडपट्टी समोर पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या अज्ञात वाहनाने त्यास कट मारला. त्यामुळे अजय ढगे ॲक्टिवासह दुभाजकावर जाऊन आदळला.

या अपघातामध्ये त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्याचा जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यु झाला. याप्रकरणी वैभव ढगे यांच्या फिर्यादीनुसार सरकारवाडा पोलिसात अज्ञात वाहनचालकाविरोधात सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दुसरी घटना गेल्या गेल्या १० तारखेला औरंगाबाद रोडवरील जनार्दन स्वामी आश्रमासमोर घडली होती. यात अंजनाबाई रामनाथ काकड (७०, रा. जायगाव, ता. सिन्नर) या रस्ता ओलांडत असताना त्यांना दुचाकीने धडक दिली.

या अपघातामध्ये त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता, त्यांचे उपचारादरम्यान मृत्यु झाला. रामनाथ काकड (७६) यांच्या फिर्यादीनुसार, आडगाव पोलिस ठाण्यात दुचाकीस्वार (एमएच १५ एफएच ४०७५) संशयित ऋषिकेश भाऊलाल कोकाटे (२०) याच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी दोन्ही पोलीस ठाण्यांकडून तपास सुरू आहे.

दुचाक्या सुसाट वेगात

दरम्यान, भरधाव वेगातील वाहनांमुळे अपघाताच्या घटना सातत्याने घडत आहेत. वाहनांच्या वाढत्या वेगावर पोलिसांकडून कोणतेही नियंत्रण नाही. वाहतूक पोलिसांकडून हेल्मेट व सीटबेल्ट याच प्रकारात वाहनचालकांना टार्गेट करून दंड वसुली केली जाते. परंतु कर्णकर्कश हॉर्न वाजवित दुचाकीस्वार सुसाट वेगात दुचाक्या चालवितात.

वाहन चालविताना पुढच्या वाहनाला कट मारणे, रस्ता ओलांडणाऱ्या ठोस देऊन पसार होणे, धुमस्टाईल वाहन चालविताना धोकादायकरित्या वाहन चालविण्याने अपघाताच्या घटना घडत आहेत. मात्र याबाबत पोलिसांकडून कोणतीही कारवाई होत नाही. सोयीस्कर दूर्लक्ष होत असल्याने इतरांचे जीव मात्र धोक्यात येत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Onion Export Duty: लोकसभेच्या धामधुमीत मोदी सरकारचा मोठा निर्णय! कांद्यावर लावले 40 टक्के निर्यात शुल्क

Rohit Sharma : टी-20 वर्ल्ड कप 2024आधी कर्णधार रोहित शर्माला झाली दुखापत; मोठी अपडेट आली समोर

Viral Video : दहा मिनिटात फर्निचर डिलिव्हरी, तेही दुचाकीवर.. कसं शक्य आहे? आनंद महिंद्रानी शेअर केला व्हिडिओ

Naresh Goyal: 'माझ्या पत्नीला कॅन्सर, मला तिच्यासोबत काही महिने राहायचे आहे'; नरेश गोयल यांची याचिका, कोर्टाने काय म्हटले?

Latest Marathi News Live Update : राज्यातील अनधिकृत शाळा होणार बंद!

SCROLL FOR NEXT