Two leopards rescued in nashik district
Two leopards rescued in nashik district 
नाशिक

जाखोरी, राहुरी शिवारात दोन बिबटे जेरबंद 

सकाळवृत्तसेवा

नाशिक : नाशिक तालुक्यातील जाखोरी व भगूरजवळील राहुरी गावाच्या शिवारात लावलेल्या पिंजऱ्यात बुधवारी (ता. ५) पहाटे दोन बिबटे जेरबंद झाले आहेत. आतापर्यंत वन विभागाला दहा बिबटे जेरबंद करण्यास यश मिळाले आहे. यादरम्यान पकडण्यात आलेले सात बिबटे बोरिवली येथील राष्ट्रीय उद्यानात पाठविण्यात आले आहेत. 

राहुरी येथील संतोष सानप यांच्या मळ्याजवळ पेरूच्या बागेत लावलेल्या पिंजऱ्यात पहाटे बिबट्या जेरबंद झाला. सरपंच व पोलिसपाटील स्वाती पानसरे यांनी वन विभागाला पाचारण केले आणि परिमंडळ अधिकारी मधुकर गोसावी व त्यांच्या पथकाने बिबट्याला ताब्यात घेतले. 

जाखोरी शिवारात रविवारी (ता.२) दराडे फार्मजवळ पिंजरा लावण्यात आला होता. बुधवारी पहाटे त्यात बिबट्या जेरबंद झाल्याचे निवृत्त विभागीय वनाधिकारी दराडे यांनी माहिती दिली. त्यानंतर वनपरिक्षेत्र अधिकारी विवेक भदाणे यांच्या मार्गदर्शनाखाली बचाव पथकाचे वनपाल मधुकर गोसावी, वनरक्षक गोविंद पंढरे यांनी बिबट्याला ताब्यात घेतले. दोन्ही बिबट्यांना गंगापूर रोपवाटिका येथे ठेवण्यात आले आहे. 

आतापर्यंत दहा बिबटे जेरबंद
आतापर्यंत नाशिक तालुक्यातून जुलै व ऑगस्टमध्ये दहा बिबट्यांना जेरबंद करण्यास वन विभागाला यश आले. नाशिक तालुक्यातील बिबट्यांनी नागरिकांवर हल्ले केले. यात काही जणांचा मृत्यू, तर बालके जखमीही झाले आहेत. पण बिबटे जेरबंद होत असल्याने नागरिक समाधान व्यक्त करत आहे.

संपादन- रोहित कणसे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Best Saving Plan : दिवसाला फक्त २५० रुपये सेव्हिंग करा अन् २४ लाख रुपये मिळवा; लखपती बनवणारी सरकारी स्कीम

MI vs KKR IPL 2024 : IPL मधून मुंबई इंडियन्सचा पत्ता कट होणे टीम इंडियासाठी ठरणार गोड बातमी? जाणून घ्या कारण

Pension Department: पेन्शनधारकांना मोदी सरकारची मोठी भेट! नवीन ऑनलाइन पोर्टल केले लाँच; मिळणार 'या' सुविधा

Latest Marathi News Live Update: राहुल गांधींना 'शेहजादा' म्हणणाऱ्या पंतप्रधान मोदींवर प्रियंका गांधींचा हल्लाबोल

Indian Navy : अरबी समुद्रात पुन्हा भारतीय नौदलाची हवा, 20 पाकिस्तानींसाठी ठरले देवदूत

SCROLL FOR NEXT