नाशिक / मालेगाव : मालेगावात कोरोना विषाणूचं थैमान सुरूच आहे. शुक्रवारी सकाळी ६ जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले. आणि आश्चर्याची बाब म्हणजे संगमेश्वर परिसरातील एकाच कुटुंबातील हे ६ जण असून सर्व रुग्ण हाय रिस्क कॉन्टॅक्टमधील कोरोनाबाधित आहेत. त्यामुळे मालेगावात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ११५ वर पोहोचली आहे. त्यातच आता आणखी २ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. ज्यामुळे शहरात चिंतेचे वातवरण आहे. आज झालेल्या मृतांमध्ये दोन्हीही पुरुषांचा समावेश असून ६५ वर्षीय वृध्द व्यक्ती, तसेच ३७ वर्षीय व्यक्ती आहेत. हे दोन्हीही रुग्ण मालेगावच्या मन्सुरा रुग्णालयात दाखल होते.
मालेगावातील वाढती रुग्णसंख्या चिंतेची बाब
मालेगावातील वाढती रुग्णसंख्या जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागासाठी चिंतेची बाब ठरत आहे. त्यातच, रमजान महिन्याला प्रारंभ होत असल्याने जिल्हा प्रशासनाची डोकेदुखी वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे. बुधवारी (ता. २२) मध्यरात्रीपासून गुरुवारी (ता. २३) सायंकाळपर्यंत आणि शुक्रवार (ता.२४) कोरोनाबाधित नवीन रुग्ण आढळल्याने मालेगावमधील रुग्णसंख्या ११५ वर पोचली आहे. नाशिक शहर व उर्वरित जिल्ह्यात १५ रुग्ण आहेत. विशेषत: नाशिक शहरामध्ये आठवडाभरात एकही नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आलेला नाही, नाशिकमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या न वाढल्याने शहरात संचारबंदीमध्ये काहीशी शिथिलता देण्यात आली आहे; परंतु नागरिकही या शिथिलतेचा गैरफायदा घेत विनाकारण घराबाहेर पडत असल्याने पोलिसांचीही डोकेदुखी वाढली आहे.
रमजान दरम्यान कोरोनाबाधितांचे मृत्यू
आज चंद्रदर्शन झाल्यास शुक्रवार (ता. 24)पासून रमजान सुरू होईल अथवा शनिवारी (ता. 25) पहिला रोजा असेल. यानंतर परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यातच गुरुवारी (ता. 23) अय्युबी चौक व अल्लामा एकबाल पुलाच्या घटनेमुळे तणाव बघावयास मिळाला. मौलाना, धर्मगुरूंनी रोजा, नमाज, तरावी यासह रमजानचे सर्व धार्मिक विधी घरात करण्याचे आवाहन केले असताना, लॉकडाउनमध्ये तरावीसाठी सूट मिळावी असा सूर काही जण आळवत आहेत. त्यांच्या मुसक्या प्रशासनाने वेळीच आवळण्याची गरज आहे. बुधवारी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याने भाजी बाजार व सोयगाव किराणा मार्केटही तीन दिवस पूर्णत: बंद करण्यात आले आहे. रमजानकाळात प्रशासनाने कंटेन्मेंट क्षेत्रात जीवनावश्यक वस्तू पोच करण्यासाठी चोख नियोजन करावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.