accident esakal
नाशिक

रस्त्याची दुरवस्था, निष्पाप तरुणाचा बळी; मोसम नदीजवळील घटना

प्रशांत बैरागी

नामपूर (जि.नाशिक) : अत्यंत संघर्षमय जीवन जगलेल्या मृत दत्तू वाघ (वय ४२) यांची कौटुंबिक परिस्थिती अत्यंत बेताची आहे. त्यांच्या मागे सहा मुली, पत्नी, आई, वडील, भाऊ, वहिनी असा परिवार आहे. सामाजिक कार्यकर्ते सुभाष वाघ यांचे ते बंधू होत. अचानक शनिवारी नियतीचा फेरा आला आणि क्षणार्धात होत्याचे नव्हते झाले. काय घडले वाचा..

नातेवाइकाच्या अंत्यविधीसाठी जाणे बेतले जीवावर

इंदिरानगर परिसरातील वाहनचालक असलेले दत्तू वाघ (वय ४२) शनिवारी (ता. २८) नातेवाइकाच्या अंत्यविधीसाठी गेले होते. तेथून परतत असताना मित्र सुधाकर वाघ यांच्यासोबत दुचाकीने साक्री रस्त्यालगत जात असताना समोरून भरधाव येणाऱ्या इनोव्हा कार (जीजे ०५, जेए ९६०९)ने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यात दुचाकीवरील दोघे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने नामपूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकारी डॉ. शाहबाज शेख यांनी प्राथमिक उपचारानंतर मालेगाव येथे दाखल केले; परंतु उपचारापूर्वीच पोटाला व डोक्याला गंभीर इजा झाल्याने दत्तू वाघ यांचे निधन झाले. मालेगाव येथील सामान्य रुग्णालयात शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात दिला. शनिवारी रात्री अकराच्या सुमारास त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. जखमी सुधाकर वाघ यांची प्रकृती ठीक असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. जायखेडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक श्रीकृष्ण पारधी, उपनिरीक्षक मिलिंद नवगिरे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

कुटुंबावर दु:खाचा डोंगर...

घरातील कर्ता पुरुष गेल्याने कुटुंबीयांवर आभाळ कोसळले आहे. येथील नामपूर-साक्री रस्त्यालगत मोसम नदीवरील पुलाजवळील धोकादायक वळणावर भरधाव येणाऱ्या इनोव्हा कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार झाला असून, एकजण गंभीर जखमी झाला. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे निष्पाप तरुणाचा बळी गेल्याने नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला.अत्यंत संघर्षमय जीवन जगलेल्या मृत दत्तू वाघ यांची कौटुंबिक परिस्थिती अत्यंत बेताची आहे. घरातील कर्ता पुरुष गेल्याने कुटुंबीयांवर आभाळ कोसळले आहे. त्यांच्या मागे सहा मुली, पत्नी, आई, वडील, भाऊ, वहिनी असा परिवार आहे. सामाजिक कार्यकर्ते सुभाष वाघ यांचे ते बंधू होत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipeeth Highway : नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गाला बांदावासियांचा तीव्र विरोध! 214 एकर जमीन बाधित होणार, ग्रामसभेत एकमुखी ठराव मंजूर

Vastu Shastra: झाडू ठेवण्याचीही असते योग्य दिशा? वास्तुशास्त्रातील ‘हा’ नियम जाणून घ्या

Raksha Bandhan 2026: पीरियड्समध्ये भावाला राखी बांधता येते का? जाणून घ्या सत्य काय अन् परंपरा काय

Latest Marathi News Live Update : मुंबईत कंत्राटदाराचा सातवा बळी, सरकारची ८६ हजार कोटींची थकबाकी

मोठा अनर्थ टळला... जुई गडकरीच्या विमानात बिघाड? कॅप्टनने वाचवलं, अभिनेत्रीच्या पोस्टने चाहते चिंतेत

SCROLL FOR NEXT