Bike Theft esakal
नाशिक

Nashik Crime News : दुचाकी चोरटा जेरबंद; दीड लाखांच्या 3 दुचाकी जप्त

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : ठक्कर बाजार बसस्थानकाच्या पार्किंगमध्ये दुचाकी चोरीच्या उद्देशाने आलेल्या संशयिताला गुन्हे शाखेच्या पथकाने शिताफीने अटक केली. पोलिस चौकशीतून त्यांच्याकडून चोरीच्या तीन दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत.

दत्ता नरहरी घोरपडे (रा. शाहूनगर, सिडको) असे संशयिताचे नाव आहे. शहर गुन्हे शाखेच्या पथकाला संशयित घोरपडे हा ठक्कर बाजार परिसरात आल्याचे समजताच पथकाने त्यास ताब्यात घेत त्याच्याकडील दुचाकीची चौकशी केली. (Two wheeler thief jailed 3 two wheelers worth one half lakh seized Nashik Crime News)

त्या वेळी त्याने सदर दुचाकी (एमएच- १५- एएफ- १८८३) तीन महिन्यांपूर्वी गंगापूर रोड परिसरातून चोरल्याची कबुली दिली. याप्रकरणी सरकारवाडा पोलिसात गुन्हा दाखल आहे. संशयितांकडे चौकशीनंतर आणखी दोन गुन्ह्यांची उकल होऊन १ लाख ५० हजार रुपयांच्या तीन दुचाकी हस्तगत केल्या आहेत.

१५ ऑगस्ट २०२२ ला त्याने गंगापूर रोड परिसरातील आकाशवाणी केंद्राजवळील सोसायटीच्या पार्किंगमधून तर परिजातनगरमधील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळून एक दुचाकी चोरली होती.

हेही वाचा : ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!

सदर कामगिरी शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय ढमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक उपनिरीक्षक रवींद्र बागूल, प्रदीप म्हसदे, प्रवीण वाघमारे, नाजीम खान पठाण, संदीप भांड, शरद सोनवणे, विशाल देवरे, प्रशांत मरकड, महेश साळुंके, मुक्तार शेख, अण्णासाहेब गुंजाळ यांच्या पथकाने केली.

नातेवाइकांना गंडा

संशयित घोरपडे हा मोलमजुरीची कामे करतानाच नातेवाईकांकडून त्यांच्या दुचाकी काहीतरी बहाण्याने घ्यायचा. मात्र परत करीत नसे. त्या दुचाकी तो इतरत्र विकून टाकायचा. अशारीतीने त्याने अनेकांना गंडा घातला आहे. पोलिस चौकशीतून आणखीही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubhanshu Shukla Research : शुभांशु शुक्लांनी अंतराळात केला थरारक प्रयोग! बनले 'या' खास गोष्टीवर संशोधन करणारे पहिले भारतीय..

Nagpur Fraud: खोट्या रजिस्ट्रीच्या आधारे उचलले ३८ लाखांचे गृहकर्ज

Pune News : रस्त्याच्या मधोमध झाडामुळे अपघाताचा धोका; प्रयेजा सिटी सोसायटी परिसरातील स्थिती, जवळच शाळा असल्याने चिंता

Latest Maharashtra News Live Updates: अर्जेंटिनाचा यशस्वी दौऱ्यानंतर , पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं ब्राझीलची राजधानी रिओ दि जनेरियो इथं भव्य स्वागत

Pune News : नानासाहेब पेशवेंच्या समाधीची दुरवस्था; परिसरात कचऱ्याची समस्या; महापालिकेच्या दुर्लक्षामुळे ऐतिहासिक वारसा उपेक्षित

SCROLL FOR NEXT