crime esakal
नाशिक

Nashik Crime: शहर पोलिसांसमोर दुचाक्या चोरट्यांचे आव्हान; पुन्हा 5 दुचाक्या लंपास

शहर आयुक्तालय हद्दीमध्ये एकीकडे पोलीस चोरीला गेल्या दुचाक्यांचा शोध घेत असताना, दुसरीकडे शहरातील दुचाक्या चोरीचे सत्र सातत्याने सुरूच आहे.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : शहर आयुक्तालय हद्दीमध्ये एकीकडे पोलीस चोरीला गेल्या दुचाक्यांचा शोध घेत असताना, दुसरीकडे शहरातील दुचाक्या चोरीचे सत्र सातत्याने सुरूच आहे.

यामुळे पोलिसांसमोर दुचाक्या चोरट्यांची मोठे आव्हान उभे राहिले आहे. शहरातून पुन्हा पाच दुचाक्या चोरीला गेल्या आहेत. (Two wheeler thieves challenge city police Again 5 two wheeler stolen Nashik Crime)

मयुर मधुकर हातवळणे (रा. मधुबन अपार्टमेंट, तारवालानगर, दिंडोरी रोड) यांची २० हजारांची दुचाकी (एमएच १५ सीएच ४२२२) त्यांच्या राहत्या घराच्या पार्किंगमधून गेल्या २५ तारखेला मध्यरात्री अज्ञात चोरट्याने चोरून नेली.

याप्रकरणी पंचवटी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किरण उंबर भदाणे (रा. हिरावाडी, पंचवटी) यांची २० हजारांची स्प्लेंडर दुचाकी (एमएच १८ बीके २३९३) गेल्या २३ तारखेला सायंकाळी चोरीला गेली.

याप्रकरणी मुंबई नाका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रमोद विनायक कुकडे (रा. पिंपळगाव खांब, नाशिक) यांची दुचाकी (एमएच १५ जीबी २४७८) गेल्या मंगळवारी (ता. ३०) सोमेश्वर मंदिराच्या पार्किंगमधून अज्ञात चोरट्याने चोरून नेली.

याप्रकरणी गंगापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिगंबर राजाराम आठवले (रा. उपेंद्रनगर, अंबड) यांची ५० हजारांची दुचाकी (एमएच १५ एफअे ६४७७) गेल्या ९ डिसेंबर रोजी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली.

याप्रकरणी अंबड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संतोष कुमार सत्यनारायण पोतदार (रा. आडकेनगर, देवळाली कॅम्प) यांची १० हजारांची दुचाकी (एमएच १५ डब्ल्यु ११९६) गेल्या २० तारखेला संडे मार्केटच्या पार्किंगमधून चोरीला गेली. याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPS Officers Transfers: महाराष्ट्रात पोलीस दलात मोठा फेरबदल! २१ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदली; कुणाची कुठे नेमणूक? जाणून घ्या यादी...

IPL 2026 Point Table: गुजरात टायटन्सने विजय मिळवून PlayOff ची चुरस अधिक रंजक बनवली; रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूवर सहज मात

HSC Result: मोठी बातमी! महाराष्ट्र बोर्डाच्या १२वी निकालाची तारीख जाहीर, कधी आणि कसा पाहता येणार? जाणून घ्या संपुर्ण प्रक्रिया

GT vs RCB Live: एवढा राग...! शुभमन गिलची कॅच घेतल्यावर विराट कोहलीने काय केलं? त्याच्याकडून अशी अपेक्षा नव्हती Video Viral

Pune News : पोलिस महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर; पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे ग्रामीणमधील ३२ अधिकारी, अंमलदारांचा समावेश

SCROLL FOR NEXT