Death News esakal
नाशिक

Nashik News : दोन दुर्घटनांत दोघा महिलांचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : तालुक्यातील चिखलओहोळ व रोकडोबानगर (दाभाडी, ता. मालेगाव) या दोन वेगवेगळ्या ठिकाणी घडलेल्या घटनेत दोघा महिलांचा आकस्मिक मृत्यू झाला.

चिखलओहोळ शिवारातील गोपीचंद खैरनार (रा. चिखलओहोळ) यांच्या शेतात कांदे काढण्याचे काम करीत असलेल्या कल्पना कृष्णा उशिरे (३२, रा. जळकू) या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमध्ये उभ्या राहून कांदे भरत असताना त्यांना अचानक चक्कर आल्याने त्यांचा तोल जाऊन त्या ट्रॉली खाली पडल्याने ट्रॉलीच्या मागील चाकाखाली सापडल्याने गंभीर जखमी झाल्या असता त्यांना उपचारासाठी सामान्य रुग्णालयात दाखल केले. (Two women died in two accidents Nashik News)

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

उपचार सुरु असतानाच त्यांचा मृत्यू झाला. तालुका पोलिस ठाण्यात या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

रोकडोबा नगरात दुसरा प्रकार घडला. येथील मयूरी भरत पाटील (वय २३, रा. रोकडोबानगर) या विवाहितेने घरातील लोखंडी ॲंगलला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली.

अंत्यवस्थ असल्याचे समजून मयूरी हिस पती भरत पाटील यांने सामान्य रुग्णालयात दाखल केले असता डॉ. पोतदार यांनी तपासून मयत घोषित केले. छावणी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

free Seed Scheme: मोफत बियाण्यासाठी ३०-३५ किमी हेलपाटे; कृषी विभागाच्या भोंगळ नियोजनाने शेतकरी संतप्त, निलंग्यात कृषी विभागाविरोधात नाराजी

Latur Farmer: अधिकारी फोटो काढून गेले अन्... मदतीचा बैलही निघाला आजारी; लातूरच्या शेतकऱ्याच्या दु:खाला अंतच नाही!

Akola News: मुलाला वाचविण्याच्या प्रयत्नात आईचाही बुडून मृत्यू; धार्मिक स्नान ठरले अखेरचे, समशेरपूर येथील घटना!

OnePlus Turbo 6X Pro मोबाईलची धमाकेदार एन्ट्री! चक्क 8000mAh एवढी मोठी बॅटरी; लॉन्च होताच डिस्काउंट, किंमत फक्त...

Latest Marathi News Live Update : गर्भवती असल्याचा दावा करणाऱ्या आरोपीच्या जामीन अर्जावर आज महत्त्वाची सुनावणी

SCROLL FOR NEXT