mps, mla.jpg 
नाशिक

'माझा माईक अन्‌ माझंच ऐक'...महामारीतही 'त्याची' फोटोसेशनसाठी धडपड!

सकाळवृत्तसेवा

नाशिक : कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव सर्वांना चिंतेत टाकणारा विषय असताना, भारतीय जनता पक्षातील लोकप्रतिनिधींची वेगळीच तऱ्हा बघायला मिळाली. बुधवारी (ता. 29) जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत पीएम- केअरसाठी आर्थिक मदतीचा धनादेश स्वीकारताना भाजप खासदार व आमदारांमध्ये धडपड बघायला मिळाली. विशेष म्हणजे, पंतप्रधान नरेंद्र मोदी वारंवार सोशल डिस्टन्सिंगचे महत्त्व विशद करीत असताना, त्यांच्याच पक्षाच्या लोकप्रतिनिधी, पदाधिकाऱ्यांनी या सूत्राचा फज्जा उडविला.

या ना त्या प्रकारे लक्ष वेधण्याचा प्रयत्न
 
जिल्हाधिकारी कार्यालयात गृहमंत्री अनिल देशमुख, आरोग्यमंत्री राजेश टोपे, पालकमंत्री छगन भुजबळ यांच्यासह सर्व प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक झाली. बैठकीस भाजपच्या खासदार डॉ. भारती पवार, आमदार प्रा. देवयानी फरांदे, राहुल ढिकले व सीमा हिरे यांच्यासह शहराध्यक्ष गिरीश पालवे उपस्थित होते. बैठक आटोपल्यानंतर सर्वांत आधी भाजपचे लोकप्रतिनिधी आवारात उभ्या असलेल्या माध्यम प्रतिनिधींजवळ आले. या ना त्या प्रकारे लक्ष वेधण्याचा प्रयत्न दिसून आला. त्याच वेळी नाशिक धान्य किराणा घाऊक व्यापारी संघटनेचे पदाधिकारी दाखल झाले. एक लाख अकरा हजारांचा मदत निधीचा धनादेशाची मदत चांगल्या भावनेने या संघटनेकडे केली होती. 

पंतप्रधान सहाय्यता निधीसाठी पीएम- केअर्सच्या नावाने असलेला धनादेश जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात चक्‍क खासदार डॉ. भारती पवार, भाजपचे शहराध्यक्ष गिरीश पालवे यांनी स्वीकारला. या वेळी आमदार देवयानी फरांदे, राहुल ढिकले, सीमा हिरे उपस्थित होते. विशेष म्हणजे, उपस्थित माध्यमकर्मींना फोटोची पोज देण्यासाठी या लोकप्रतिनिधींनी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडवत अगदी एकमेकांमध्ये अगदी कमी अंतर ठेवून उभे होते.  


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

साहिल मोबाईल वापरून करत होता कॉपी, परीक्षेवेळचा CCTV VIDEO आला समोर

Mohol News : मोहोळ तालुक्यातील मंदिरातील वाढत्या चोऱ्या संदर्भात पोलीस सतर्क; व्यवस्थापक पुजारी व ट्रस्टी यांच्या तातडीच्या बैठकीचे आयोजन, अकरा सूचनांचे पालन करण्याची सूचना

Mangalwedha News : मनरेगा योजनेतील रोजगार सेवकासाठी नव्याने काढलेल्या शासन निर्णयावरून राज्यभरात संताप

IIT Bombay Student Death : आयआयटी बॉम्बे बाहेर 'जस्टिस फॉर साहिल' आंदोलन; प्रकाश आंबेडकरांचे पुत्र सुजात यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने, प्रशासनाला दिला कडक इशारा

IAS मेधा रूपम यांना दिलासा, हायकोर्टाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती

SCROLL FOR NEXT