(फोटोसह बातमी फक्त तीन कॉलमातच घ्यावी)
NSK26H31738
जळगाव : आनंदा पाटील यांच्या पुस्तकाचे प्रकाशन करताना दिनेश वाघमारे. सोबत डॉ. आर. के. नारखेडे, किशोर मेढे, डॉ. मिलिंद बागूल, प्रा. डॉ. सत्यजित साळवे, रणधीर सोमवंशी, आनंदा पाटील आदी.
‘उजेड पेरणारी माणसं’ नव्या पिढीसाठी प्रेरणादायी
---
राज्य निवडणूक आयुक्त वाघमारे : आनंदा पाटील यांच्या पुस्तकाचे प्रकाशन
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. ८ : समाजमाध्यमे आणि रीलच्या जाळ्यात आजची नवी पिढी गुरफटलेली असून वाचनाची आवड कमी होत चालली आहे. मात्र, अशा प्रतिकूल परिस्थितीतही ''उजेड पेरणारी माणसं'' या पुस्तकाची दुसरी आवृत्ती प्रकाशित होणे ही कौतुकास्पद बाब आहे. हे पुस्तक वाचकांसाठी खऱ्या अर्थाने प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास राज्याचे निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी व्यक्त केला.
जळगावात डॉ. अण्णासाहेब जी. डी. बेंडाळे महिला महाविद्यालय (स्वायत्त), मराठी भाषा विभाग आणि उत्तर महाराष्ट्र प्रगतिशील लेखक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आनंदा पाटील लिखित ‘उजेड पेरणारी माणसं’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा बुधवारी (ता. ७) पार पडला. अभिजात मराठी भाषा सप्ताहाच्या औचित्याने पुस्तकाचे प्रकाशन त्यांच्याहस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. आर. के. नारखेडे होते, तर अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे माजी सदस्य किशोर मेढे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रगतिशील लेखक संघाचे संघटक डॉ. मिलिद बागूल, उपप्राचार्य प्रा. डॉ. सत्यजित साळवे, उपप्राचार्य प्रा. डॉ. प्रमोद तायडे, प्रा. एन. जी. बावस्कर, जि. प. चे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी, कार्यकारी अभियंता सतीश शिसोदे उपस्थित होते.
दीपस्तंभांची ओळख
''उजेड पेरणारी माणसं'' हे पुस्तकाचे शीर्षक उत्कंठावर्धक आणि सकारात्मकतेचा संदेश देणारे आहे. त्यात केवळ ८४ व्यक्तीचित्रणेच लेखकाने का निवडली? हे एक कोडं आहे. ते त्यांच्या पुढील आवृत्तीत उलगडू शकते. वडिलांची इच्छा साहित्यसेवेच्या माध्यमातून आनंदा पाटील यांनी पूर्ण केल्याचे समाधान वाटते. अवतीभवती असलेल्या दीपस्तंभांची ओळख या पुस्तकातून होते, असे राज्याचे निवडणूक आयुक्त वाघमारे यांनी नमूद केले.
---
चौकट
सकारात्मक संदेश देणारे पुस्तक
वंचित घटकांतील मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी धडपडणारी वैशाली झाल्टे, राजश्री सुरवाडे, कॅरीबॅग निर्मूलन चळवळीत योगदान देणाऱ्या शैला सावंत, वामन कर्डक यांचा वैचारिक वसा चालवणारे भीमशाहीर प्रतापसिंग बोदडे, दिलीप घोडेस्वार यांच्यासह विविध क्षेत्रात समर्पित भावनेने काम करणाऱ्यांवर लिहिलेले लेख अभ्यासपूर्ण आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.