Uddhav Thackrey Esakal
नाशिक

Uddhav Thackrey : नाशिकमधील पडझड थांबणार? खुद्द उद्धव ठाकरे ...

एकनाथ शिंदे आणि समर्थक आमदार यांनी बंड केल्यापासून शिवसेनेच्या ठाकरे गटाला गळती

सकाळ डिजिटल टीम

एकनाथ शिंदे आणि समर्थक आमदार यांनी बंड केल्यापासून शिवसेनेच्या ठाकरे गटाला गळती सुरू झाली आहे. तर सर्वात जास्त फटका नाशिकमध्ये बसल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे ही गळती थांबवण्यासाठी आणि पुन्हा एकदा पक्षाला बळ देण्यासाठी उद्धव ठाकरे नाशिकला जाणार आहेत.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांची जानेवारी अखेर किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात नाशिकमध्ये जाहीर सभा घेणार असल्याची माहिती आहे. यासाठी शिवसेना खासदार संजय राऊत 6 आणि 7 फेब्रुवारीला नाशिक दौऱ्यावर येणार आहेत. लवकरच शिवसेना ठाकरे गटाची तोफ नाशिकमध्ये धडकणार हे निश्चित आहे.

हे ही वाचा : ..तर तुम्हालाही मिळू शकेल इन्कमटॅक्सचा जुना रिफंड

दरम्यान राज्यात सत्तांतर झाल्यावर ठाकरे गटाला नाशिकमधूनच पहिला धक्का बसला होता. त्यानंतर ठाकरे गटातील निकटवर्तीय आणि जवळच्या शिवसैनिकांनी ठाकरे गटाला राम राम ठोकला आणि सत्तेतील शिंदे गटात प्रवेश केला. या डॅमेज कंट्रोलसाठी वेळोवेळी संजय राऊतांनी दौरा केला. परंतु डॅमेज कंट्रोल होण्याऐवजी ठाकरे गटाचे नेते शिंदे गटात प्रवेश करत होते.

ही गळती रोखण्यासाठी आता थेट शिवसेना नेते पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे स्वतः नाशिकमध्ये जाहीर सभा घेणार असल्याचे समजते आहे. तर मागील महिन्यात शिवसेनेला जोरदार धक्के बसले. अनेक नगरसेवक, पदाधिकारी, आमदार यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यानंतर राऊतांचे निकटवर्तीय असलेल्या संपर्क प्रमुख भाऊ चौधरीसह माजी आमदार, माजी नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला. त्यामुळे सद्यस्थितीत नाशिकमध्ये ठाकरे गटाला योग्य दिशा देण्यासाठी स्वतः उद्धव ठाकरे मैदानात उतरणार आहेत.

नाशिकमधून ठाकरे गटाला मोठमोठे धक्के बसत गेले. यामध्ये दोन आमदार, एक खासदार, काही माजी खासदार आणि शहरातील 12 माजी नगरसेवक तसेच काही पदाधिकारी शिंदे गटात गेले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Illegal Immigrants India : नक्षलवादानंतर आता घुसखोरांवर सर्जिकल स्ट्राईकची तयारी, अमित शहा यांनी बोलावली मोठी बैठक

Civic Works Halted: मतदार यादी पडताळणीमुळे पथ व भवन विभागाची कामे ठप्प; अभियंत्यांना मोहिमेतून मुक्त करण्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

Sourav Sonawane news: 'सोनवणेंना अटक करा', घुले कुटुंबीय थेट पाण्याच्या टाकीवर चढले

Shrikant Shinde चा ताफा अडवला, काळे झेंडे दाखवत शिवसैनिकांकडून जोरदार घोषणाबाजी

Kolhapur Crime: मुलगा की मुलगी? कोल्हापुरात गर्भलिंग निदानचा पर्दाफाश, चौघे ताब्यात; ३० हजार दर

SCROLL FOR NEXT