UGC NET exam sakal media
नाशिक

UGC-NET Exam : युजीसी-नेट अर्जाची 31 पर्यंत मुदत

जूनमध्ये ८३ विषयांची राष्ट्रीय स्‍तरावर होणार परीक्षा

सकाळ वृत्तसेवा

UGC-NET Exam : नॅशनल टेस्‍टींग एजन्‍सीतर्फे जूनमध्ये ८३ विषयांसाठी राष्ट्रीय स्तरावर युजीसी-नेट परीक्षा घेतली जाणार आहे.

पात्र विद्यार्थ्यांना ऑनलाइन नोंदणी करण्यासाठी ३१ मेपर्यंत मुदत देण्यात आली आहे. (UGC NET exam application deadline till 31st nashik news)

ज्‍युनियर रिसर्च फेलोशिप आणि सहाय्यक प्राध्यापकपदासाठी युजीसी-नेट ही परीक्षा संगणकावर आधारित असेल. परीक्षेसाठी ऑनलाइन स्‍वरुपात अर्ज करण्याची मुदत ३१ मेपर्यंत आहे. १३ ते २२ जूनदरम्‍यान ही परीक्षा घेण्याचे नियोजन आहे.

दरम्यान, परीक्षेसंदर्भात माहिती जारी करण्यात आली असली, तरी अधिकृत सूचनापत्राची प्रतीक्षा कायम होती. बुधवारी (ता. १०) सायंकाळी उशिरापर्यंत सूचनापत्र व नोंदणीची लिंक सक्रिय झालेली नव्‍हती

वेळापत्रक आले पूर्वपदावर

कोरोना महामारीमुळे विविध परीक्षांचे वेळापत्रक विस्कळीत झालेले होते. संपूर्ण यंत्रणा कोलमडल्‍याने विलंबाने परीक्षा होत होत्‍या. वर्षातून दोन वेळा जून आणि डिसेंबरमध्ये या परीक्षा घेण्याचे नियोजित असताना प्रत्‍यक्षात वेळापत्रक पाळण्यात आलेले नव्‍हते.

२०२० आणि २०२१ वर्षांची युजीसी नेट एकत्रितरित्‍या घेण्यात आली. तर डिसेंबर २०२२ सत्रातील युजीसी नेट परीक्षा यंदा फेब्रुवारी-मार्चमध्ये झाली. त्यानंतर आता जून सत्रातील परीक्षा मात्र निर्धारित वेळेत घेताना वेळापत्रक पूर्वपदावर आणण्याचा प्रयत्‍न केला जातो आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ब्रिटनमध्ये तांत्रिक बिघाडामुळे एअर ट्राफिक, हजारो उड्डाणे रद्द; जगभरातील विमानसेवेला फटका, विमानतळांवर प्रवाशांची गर्दी

Premnagarcha Maharaja: मुंबईत आगमनसोहळ्यात मोठी दुर्घटना, तातडीने गणेशमूर्तीचं विसर्जन, नेमकं काय घडलं?

Marathi News Live Updates : मनोज जरांगे -पाटलांच्या उपोषणाचा आजचा बारावा दिवस, आतापर्यंत काय घडलं

Smart Meter Fire Uchgaon : उचगावमध्ये नवीन स्मार्ट मीटरने घेतला पेट; पहाटे घडलेल्या घटनेमुळे खळबळ, स्मार्ट मीटरच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा प्रश्नचिन्ह

मुख्यमंत्र्यांची मिमिक्री करणाऱ्याच्या मदतीने करायचा घोटाळे; भ्रष्टाचार, बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी बड्या अधिकाऱ्याला अटक

SCROLL FOR NEXT