नाशिक

उज्ज्वल स्कूलमध्ये क्रीडा महोत्सवाचा उत्साहात प्रारंभ

CD
NSK26H34351 जळगाव : उज्ज्वल स्कूलच्या उद्घाटनप्रसंगी संचलन करताना विद्यार्थी. सोबत नितीन बरडे, सचिन निकम आणि मानसी गगडाणी, विजय विसपुते आदी. ---- उज्ज्वल स्कूलमध्ये क्रीडा महोत्सवाला सुरुवात मशाल दौड, दीपप्रज्वलन आणि शिस्तबद्ध संचलनाने वेधले लक्ष सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. २ : विद्यार्थ्यांमध्ये क्रीडाभावना, खिलाडूवृत्ती, शिस्त, संघभावना आणि नेतृत्वगुण विकसित करण्याच्या उद्देशाने उज्ज्वल स्कूलमध्ये आयोजित तीन दिवसीय ‘उज्ज्वल क्रीडा महोत्सव २०२६’चा उत्साहात प्रारंभ झाला. मशाल दौड, दीपप्रज्वलन आणि चार हाऊसच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या शिस्तबद्ध संचलनामुळे उद्घाटन सोहळ्यात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून महापालिकेचे नगरसेवक तथा महाराष्ट्र कबड्डी असोसिएशनचे सदस्य आणि जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सचिव नितीन बरडे, तसेच जळगावचे क्रीडा अधिकारी सचिन निकम उपस्थित होते. शाळेच्या प्राचार्या मानसी गगडाणी यांचीही उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या मशाल दौडीने झाली. क्रीडाज्योत हातात घेऊन विद्यार्थ्यांनी मैदानावर फेरी मारली. या माध्यमातून एकता, जिद्द, चिकाटी आणि खिलाडूवृत्तीचा संदेश देण्यात आला. त्यानंतर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. उद्घाटन सोहळ्यात चार हाऊसच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेले शिस्तबद्ध आणि दिमाखदार संचलन विशेष आकर्षण ठरले. तीन दिवस चालणाऱ्या या महोत्सवात इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतचे विद्यार्थी विविध क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी होणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Metro: बाणेर-बालेवाडीतील मेट्रो स्थानकांना डावलल्याने नागरिक रस्त्यावर; मेट्रो सुरू करण्यास विरोध, आंदोलनकर्ते ताब्यात

IND vs NZ : विराट कोहली न्यूझीलंडमध्ये सचिन तेंडुलकरचा आणखी एक विक्रम मोडणार? सेहवागलाही मागे टाकण्याची संधी

Koyna Dam Water Release : कोयनेच्या विसर्गाने वाहू लागली 'कृष्णा'; शेतकऱ्यांना मोठा दिलासा, शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत

Latest Marathi News Live Update : पुण्यातील वाहतूक कोंडी 4 वर्षांत कमी होणार, देवेंद्र फडणवीस

Gangapur Drought: दुष्काळात जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर होऊ नये; कृषी आयुक्तांनी थेट शेतात जाऊन आखले नियोजन!

SCROLL FOR NEXT