नाशिक

उज्ज्वल निकम यांची भूमिका साकारण्यासाठी त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सखोल अभ्यास केला अभिनेता राजकुमार राव यांची भावना

CD
NSK26H32017 व NSK26H32018 जळगाव : छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहात रविवारी झालेल्या कार्यक्रमात बोलताना खासदार ॲड. उज्ज्वल निकम. शेजारी अभिनेता राजकुमार राव, नाट्यकलावंत शंभू पाटील, ॲड. अनिकेत निकम. दुसऱ्या छायाचित्रात मंत्री संजय सावकारे, खासदार स्मिता वाघ, आमदार सुरेश भोळे, उद्योगपती अशोक जैन, जिल्हाधिकारी रोहन घुगे, पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, नगराध्यक्षा साधना महाजन, ॲड. सुशील अत्रे आदी. --------------- ॲड. निकमांच्या व्यक्तिमत्त्वाचा अभ्यास केला --------- अभिनेता राजकुमार राव : चित्रपटातून न्यायालयीन संघर्ष उलगडणार, २६/११ खटल्यातील महत्त्वाच्या घटनांवर प्रकाश सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. ११ : एखाद्या व्यक्तीची भूमिका साकारताना केवळ तिचे बाह्यरूप आत्मसात करणे पुरेसे नसते, तर तिची विचार करण्याची पद्धत, बोलण्याची शैली, कामाप्रती असलेले समर्पण व प्रतिकूल परिस्थितीत घेतलेले निर्णय समजून घेणे महत्त्वाचे असते. त्यामुळे ज्येष्ठ विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची भूमिका साकारण्यासाठी त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा व न्यायालयीन लढ्याचा सखोल अभ्यास केला, अशी भावना अभिनेता राजकुमार राव यांनी व्यक्त केली. ‘प्रहार’ चित्रपटानिमित्त शहरात झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. ॲड. निकम यांच्या आयुष्यातील संघर्ष, महत्त्वाच्या खटल्यांतील न्यायालयीन लढा व त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील विविध पैलू ‘प्रहार’ चित्रपटातून प्रेक्षकांसमोर येणार आहेत. या वेळी झालेल्या संवादात राजकुमार राव, ॲड. उज्ज्वल निकम, शंभू पाटील व ॲड. अनिकेत निकम यांनी चित्रपटाची निर्मिती, व्यक्तिरेखेचा अभ्यास व ‘२६/११’च्या दहशतवादी हल्ल्याच्या खटल्यातील महत्त्वाच्या घटनांवर चर्चा केली. चित्रपटाचे पहिले सार्वजनिक प्रदर्शन जळगावातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी करण्यात आले. विद्यार्थ्यांनी चित्रपटाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याचे आयोजकांनी सांगितले. पाकचा चेहरा समोर आणणे हे उद्दिष्ट मुंबईवरील २६/११च्या दहशतवादी हल्ल्यानंतर अजमल कसाबला न्यायालयात दोषी सिद्ध करून फाशीपर्यंत पोहोचविणे, हेच एकमेव उद्दिष्ट नव्हते, तर या हल्ल्यामागील पाकिस्तानचा दहशतवादी चेहरा संपूर्ण जगासमोर आणणे, हेही महत्त्वाचे होते, अशी भूमिका उज्ज्वल निकम यांनी मांडली. या खटल्यात भावनांपेक्षा पुरावे व कायदेशीर प्रक्रियेला महत्त्व देणे आवश्यक होते. हल्ल्यामागील कट उघड करून सत्य न्यायालयासमोर सिद्ध करणे, हे मोठे आव्हान होते, असे त्यांनी स्पष्ट केले. तुकाराम ओंबळे यांचे धैर्य ऐतिहासिक २६ नोव्हेंबर २००८ ला मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात अनेक पोलिस अधिकारी व जवानांनी प्राणांची बाजी लावली. हेमंत करकरे, अशोक कामटे व विजय साळसकर यांच्यासह अनेकांनी कर्तव्य बजावताना बलिदान दिले. पोलिस शिपाई तुकाराम ओंबळे यांनी अजमल कसाबला जिवंत पकडण्यासाठी दाखविलेले धैर्य ऐतिहासिक ठरले. कसाब जिवंत पकडला गेल्याने त्याच्याविरुद्ध न्यायालयीन खटला चालविणे व दहशतवादी कटासंबंधी महत्त्वाचे पुरावे सादर करणे शक्य झाले, असेही ॲड. निकम यांनी नमूद केले. वास्तवाला प्राधान्य देण्याचा आग्रह चित्रपटाची कथा तयार करण्यापूर्वी निर्मिती पथकाने उज्ज्वल निकम यांच्याशी संवाद साधून त्यांच्या आयुष्यातील अनुभव व महत्त्वाच्या घटनांची माहिती घेतली. वास्तवावर आधारित कथा मांडताना सत्याला प्राधान्य दिले पाहिजे. व्यक्तिरेखेच्या तोंडी घातले जाणारे संवाद व दाखविल्या जाणाऱ्या घटनांना वास्तवाचा आधार असावा, असा आग्रह आपण धरल्याचे निकम यांनी सांगितले. ....... जळगावकरांच्या प्रेमाने भारावले राजकुमार राव चित्रपटाच्या प्रमोशनसाठी विविध शहरांत जात असताना, जळगावात मिळालेले प्रेम व आपुलकी आनंद देणारी आहे. चांगल्या चित्रपटांना प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळणे महत्त्वाचे असते. जळगावकरांनी दाखविलेल्या प्रेमाबद्दल आभार मानत आगामी काळात पुन्हा जळगावला येऊन प्रेक्षकांना भेटण्याची इच्छा राजकुमार राव यांनी व्यक्त केली. उज्ज्वल निकम यांनीही जळगावशी असलेले भावनिक नाते अधोरेखित केले. शहरातील नागरिकांची आपुलकी व उत्साह विशेष असल्याचे सांगत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकडून मिळालेल्या प्रतिसादाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. कार्यक्रमास जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन, राज्याचे वस्त्रोद्योगमंत्री संजय सावकारे, खासदार स्मिता वाघ, आमदार सुरेश भोळे, जिल्हाधिकारी रोहन घुगे, पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, महापौर दीपमाला काळे, जामनेरच्या नगराध्यक्षा साधना महाजन, ॲड. अनिकेत निकम, ॲड. सुशील अत्रे, संजय पवार, माजी मंत्री गुलाबराव देवकर, माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, रजनीकांत कोठारी, गनी मेमन, शंभू पाटील, हर्शल पाटील आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT