Dr. Subhash Pawar esakal
नाशिक

Ultraman: अल्ट्रामॅन डॉ. सुभाष पवारांचा मेक्सिकोत डंका! वयाच्या 67व्या वर्षी स्पर्धा पार करणारे एकमेव भारतीय

सकाळ वृत्तसेवा

Ultraman : नाशिकचे आयर्नमॅन म्हणून ओळख असलेले डॉ. सुभाष पवार यांनी नुकतेच मेक्सिकोतील कोझुमेल बेटावर ‘अल्ट्रामॅन’ स्पर्धा पार करून वेगळा विक्रम स्थापित केला आहे.

वयाच्या ६७ व्या वर्षी इतकी कठीण स्पर्धा पार करणारे ते पहिले भारतीय ठरल्याचे प्रा. प्रशांत पाटील यांनी म्हटले आहे. (Ultraman Dr Subhash Pawar won in Mexico Only Indian to complete event at age of 67 nashi news)

मेक्सिकोमध्ये ९ ते ११ एप्रिल २०२३ या कालावधीत ‘अल्ट्रामॅन’ स्पर्धा घेण्यात आली. यात जगभरातील २० स्पर्धकांसोबत त्यांनी सहभाग घेतला. कोच पुण्याचे चैतन्य वेल्हाळ यांच्यासोबत ३० मार्चला ते मेक्सिकोत गेले आणि आणखी एक क्रू मेंबर एनजेल यांना त्यांच्या दोन मुलांसोबत आपल्या टीममध्ये सामावून घेतले.

पहिल्या दिवशी म्हणजे ९ एप्रिलला त्यांनी समुद्राची दहा किलोमीटर स्वीमिंग व १४५ किलोमीटर सायकलिंग पूर्ण केले. दुसऱ्या दिवशी त्यांनी २८० किलोमीटर सायकलिंग पूर्ण केले. तिसऱ्या दिवशी त्यांनी ८५ किलोमीटर रनिंग पूर्ण केले.

पूर्ण स्पर्धा त्यांनी ४१ तास ७ मिनिटांत पूर्ण केली. स्पर्धा पूर्ण करताना त्यांचे वय ६७ वर्षे होते. या वयात अल्ट्रामॅन स्पर्धा पूर्ण करणारे ते भारतातील एकमेव स्पर्धक आहेत. तरुणांकरता त्यांनी आदर्श घालून दिला आहे.

त्यांच्या मुलाने अल्ट्रामॅन स्पर्धा त्यांच्याआधी दोन महिने म्हणजेच फेब्रुवारीत पूर्ण केली. भारतात अल्ट्रामॅनची स्पर्धा पूर्ण करणारी वडील व मुलाची ही एकमेव जोडी आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

डॉ. पवार मुळचे जायखेड्याचे

डॉ. सुभाष पवार यांचा जन्म सटाणा तालुक्यातील जायखेडा येथे झाला. बारा भावंडांमध्ये त्यांचा तिसरा क्रमांक. शेतकरी कुटुंबात जन्म झाल्यामुळे त्यांना लहानपणापासूनच अंग मेहनतीची तसेच, विहिरीत व नदीत पोहण्याची सवय होती. त्यांचे पाचवीपर्यंत शिक्षण जायखेडा व नंतर नाशिक येथे रुंगटा हायस्कूलला झाले.

आठवीत हिंदी राष्ट्रभाषा सभा पुणे परीक्षेत ते महाराष्ट्रात प्रथम आले. नाशिक येथील आयुर्वेदिक कॉलेजमधून बी. ए. एम. एस पदवी मिळवली. पदवी परीक्षेत ते पुणे विद्यापीठात प्रथम आले. त्यानंतर त्यांनी सातपूर कॉलनी व सातपूर गाव येथे क्लिनिक सुरू केले आणि बघता बघता सातपूर मधील ते प्रथितयश डॉक्टर झाले.

जिद्द आणि फिटनेस महत्त्वाचा

"लहानपणापासून कष्टाची सवय, जिद्द व शारीरिक फिटनेस महत्त्वाचा असतो. आवडीच्या क्षेत्रात काम करण्यासाठी वयाचे कोणतेही बंधन नसते."-डॉ. सुभाष पवार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Thalapathy News: विजय थलपतींनी २०२६च्या तामिळनाडू निवडणुकीबाबत केली मोठी घोषणा!

Rajgad News : वेल्हे तालुक्याचे नामकरण राजगड तालुका; ढोल ताशांच्या गजरात राजगडच्या मावळ्यांचा जल्लोष

Asia Cup 2025: 'श्रेयस, जैस्वाल, सिराज पाकिस्तानमध्ये असते, तर...' भारतीय संघातून वगळल्यानंतर माजी क्रिकेटपटूचं मोठं विधान

Thane News: काँग्रेसच्या माजी नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश; पदाधिकाऱ्यांच्या पक्षत्यागावर संतोष केणेंचा माजी आमदारांवर थेट आरोप, म्हणाले...

Maharashtra Latest News Update: माटुंगा पोलिसांच्या थरारक कारवाईत दरोड्यातील मुख्य आरोपी अटक

SCROLL FOR NEXT