नाशिक

एक हात मदतीचा

CD
SMD26B01202 उंबरखडवा : शाळेला स्टिकर साऊंड व‌ एलसीडी‌ देताना मान्यवर. ---------- उंबरखडवा शाळेत दातृत्वाचा मेळा ‘एक हात मदतीचा’ उपक्रमातून दोन दात्यांचे योगदान सकाळ वृत्तसेवा सामोडे, ता. ४ : विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीला हातभार लावण्यासाठी समाजातील दानशूर व्यक्तींनी पुढाकार घेतल्याने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, उंबरखडवा येथे ज्ञानदानाचा प्रेरणादायी सोहळा रंगला. ‘एक हात मदतीचा’ या उपक्रमांतर्गत शैक्षणिक साहित्य वितरण आणि दातृत्वाचा सन्मान सोहळा उत्साहात पार पडला. या वेळी शाळेला सुमारे २० हजार रुपये किमतीचे शैक्षणिक साहित्य भेट देण्यात आले. अध्यक्षस्थानी धनेर केंद्राचे केंद्रप्रमुख देवेंद्र पाटील होते. विद्यार्थ्यांना आधुनिक शैक्षणिक सुविधा उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने सहायक दुय्यम निबंधक वर्ग-२, नंदुरबार येथील सुरेश रतिलाल पवार यांनी १५ हजार रुपये किमतीची स्पीकर व साउंड सिस्टीम शाळेला भेट दिली. तसेच विशेष शिक्षक भगवान खांडेकर यांनी पाच हजार रुपये किमतीचा एलसीडी संच भेट देत शाळेच्या शैक्षणिक विकासात योगदान दिले. मुख्याध्यापक रघुनाथ चौरे यांच्या हस्ते सुरेश पवार यांचा, तर उपक्रमशील शिक्षक रामलाल चौरे यांच्या हस्ते भगवान खांडेकर यांचा सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. अध्यक्ष देवेंद्र पाटील यांचाही सन्मान करण्यात आला. सुरेश पवार, भगवान खांडेकर, रघुनाथ चौरे यांनी मनोगत व्यक्त केले. केंद्रप्रमुख देवेंद्र पाटील यांनी शाळेतील उपक्रमांचे कौतुक केले. रामलाल चौरे यांनी सूत्रसंचालन केले. मखुबाई बहिरम व मंजुळा बागूल यांनी नियोजन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aaditya Thackeray: आदित्य ठाकरेंसमोर शेतकऱ्यांचा संताप! ५ हजारांची मदत ७० टक्के शेतकऱ्यांना मिळालीच नाही; फायनान्स कंपन्यांचाही तगादा

Land Buying Tips: जमीन खरेदी करताना फसू नका! व्यवहाराआधी 7/12 उताऱ्यापासून खरेदीखतापर्यंत 'या' गोष्टी नक्की तपासा!

IND vs NZ, Viral Video: भर मैदानात प्रेम व्यक्त! अर्शदीपने सांगितलं ते अनोखं सेलिब्रेशन नक्की कोणासाठी? म्हणाला, 'तिच्याचसाठी...'

Explained: अमेरिकेच्या मध्यावधी निवडणुकांमध्ये 'इतक्या' मुस्लिम उमेदवारांनी मारली बाजी; एकाने तर इतिहासच रचला, काय असेल पुढील आव्हान?

IND vs NZ, 1st ODI: आधी अर्शदीपचा तिखट मारा अन् मग विराट कोहलीची वादळी फिफ्टी! भारताची विजयासह वनडे मालिकेची दणक्यात सुरुवात

SCROLL FOR NEXT