UML26B01555, UML26B01556
दिंडोरी ः उमराळे उपबाजार आवार सुरु करण्याबाबत पणनमंत्री रावल यांना निवेदन देताना माजी आमदार रामदास चारोस्कर व शेतकरी.
३०-२
उमराळे उपबाजार आवार
सुरू होण्याबाबत आशा
------------------
सकारात्मक निर्णयाचे रावलांचे आश्वासन
--------------
सकाळ वृत्तसेवा
उमराळे,ता.१२ ः दिंडोरी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मालाला हक्काची बाजारपेठ उपलब्ध व्हावी, यासाठी बाजार समितीच्या प्रस्तावित उमराळे उपबाजाराला मंजुरी मिळावी, अशी मागणी पणनमंत्री जयकुमार रावल यांच्याकडे करण्यात आली. यावर सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन मंत्र्यांनी दिले.
दिंडोरीचे माजी आमदार रामदास चारोस्कर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मंत्री रावल यांची भेट घेतली. उपसभापती दत्तू भरे, माजी उपसभापती योगेश बर्डे यांच्यासह शेतकरी प्रतिनिधी उपस्थित होते. उमराळे उपबाजार सुरू करण्याच्या प्रस्तावावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
दिंडोरी तालुका शेतीप्रधान असून, उमराळे, पेठ, कळवण आदी परिसरातील शेतीमालाच्या विक्रीसाठी योग्य बाजारपेठ उपलब्ध होणे आवश्यक आहे. उमराळे येथे उपबाजार सुरू झाल्यास परिसरातील शेतकऱ्यांना स्थानिक पातळीवरच शेतीमाल विक्रीची सुविधा उपलब्ध होईल. त्यामुळे वाहतूक खर्च आणि वेळ वाचण्यास मदत होणार असून, शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे.
उमराळे उपबाजाराच्या मंजुरीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी शासनस्तरावर आवश्यक कार्यवाही केली जाईल,असे आश्वासन मंत्री जयकुमार रावल यांनी दिल्याने शेतकऱ्यांच्या आशा उंचावल्या आहेत.
--------------------