umrane election.png 
नाशिक

लोकशाहीचा अक्षरश: घात! उमराणे ग्रामपंचायत निवडणूक लिलावात सरपंचपदासाठी बोली; लिलावाचा VIDEO सोशल मीडियावर व्हायरल

अभिजीत सोनावणे

नाशिक : सध्या ग्रामीण भागात ग्रामपंचायतीची रणधुमाळी सुरू आहे. अशाताच सर्व इच्छुकांचा उत्साह शिगेला पोहचला आहे. अशात एक व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हयरल होताना दिसत आहे. तो म्हणजे देवळा तालुक्यातील उमराणे ग्रामपंचायत निवडणूक लिलाव होत असल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होताना दिसत आहे.

लोकशाहीची अक्षरशः हत्या

देवळा तालुक्यातील उमराणे ग्रामपंचायत  सरपंचपदासाठी झालेल्या लिलावात कोट्यवधी रूपयांची बोली लावण्यात आली. अखेर २ कोटी ५ लाखांत सरपंचपदाचा लिलाव करून उमराणे गावच्या पुढाऱ्यांनी लोकशाहीची अक्षरशः हत्या केली. या प्रकाराचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर चांगलाच व्हायरल झाला आहे.

 १ कोटी ११ लाखांपासून झाली होती लिलावाला सुरवात ...

१ कोटी ११ लाखांपासून सुरु झालेल्या लिलाव हा २ कोटी ५ लाखावर पोहोचला. माजी जिल्हा परिषद सदस्य प्रशांत देवरे यांच्या नेतृत्वाखालील पॅनलचे सुनील दत्तू देवरे यांनी हा लिलाव जिंकल्याचे व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे. अनेक ग्रामपंचायतींमध्ये सरपंचपदासाठी लिलाव लावला जात आहे.कांदा बाजार समितीमुळे उमराणे गाव नावारूपाला आले आहे.गावाचे ग्रामदैवत असलेल्या श्री रामेश्वर महाराज मंदिर आवारात लिलावात बोली लावण्यात आली. लिलावाचा निधी वापरणार मंदिर बांधणीसाठी लावण्यात येणार असल्याचे समजत आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Import India : गॅस संकट कमी होणार ! कतारहून भारतात आणला ४६,००० मॅट्रिक टन LPG; तब्बल 'इतके' लाख सिलिंडर्स भरणार

Chhatrapati Sambhajinagar News: लातूर-नांदेडला अवकाळी पावसानं झोडपलं, वीज कोसळून १६ वर्षीय मुलीचा मृत्यू; वादळी वाऱ्यानं मोठं नुकसान

Latest Marathi News Live Update : स्री बीज तस्करी प्रकरणात नाशिकमधील तीन आयव्हीएफ सेंटर रडारवर

Adani Group: अदानींबरोबर करार मोडला, ७५०० कोटी द्यावे लागणार? राज्याला भुर्दंड, तपासणी नाके बंद करण्यात अदानींच्या अटीचा अडथळा

Fake Currency Kolhapur : कोल्हापूर शहराच्या भरवस्तीत बनावट नोटा विक्रीचा प्रकार, लाखो रुपयांच्या काळाबाजार उघड

SCROLL FOR NEXT