नाशिक

ना फेरीवाला क्षेत्र फलकाच्या खालीच अतिक्रमण महापालिकेचे दुर्लक्ष

CD
पान दोन ----------------------------- 14958 नाशिक : ना फेरीवाला क्षेत्र फलकाच्या खाली अनधिकृरित्या केलेले अतिक्रमण. ना फेरीवाला क्षेत्र फलकाखाली अतिक्रमण; महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष सकाळ वृत्तसेवा जुने नाशिक, ता.६: ना फेरीवाला क्षेत्र फलकाच्या खालीच मोठ्या प्रमाणावर अनधिकृत अतिक्रमण करून व्यवसाय सुरू आहे. शहरातील मेन रोड परिसरातील घाडगे महाराज पुतळा परिसरात अशा प्रकारचे चित्र दिसून येत आहे. अतिक्रमण पथकाकडून ठराविक ठिकाणचे अतिक्रमण काढून कारवाईचा गाजावाजा केला जातो. मेन रोड गाडगे महाराज चौकात चक्क ना फेरीवाला क्षेत्र लावण्यात आलेल्या फलकाखालीच काही व्यावसायिकांकडून अनधिकृतरीत्या व्यवसाय केला जात आहे. असे असताना महापालिका अतिक्रमण पथकाकडून त्याकडे का दुर्लक्ष होत आहे. असे प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केले जात आहे. त्या दुकानांवर मोठ्या प्रमाणावर ग्राहकांची गर्दी होत असल्याने वाहतुकीसही अडचण निर्माण होत असते. मेन रोड येथून साक्षी गणेश मंदिराकडे जाणाऱ्या मार्गावर याच भागातून वळण घेतले जाते. अशा वळणावरच अनधिकृत व्यवसाय ठरला असल्याने नागरिकांसह वाहन चालकांनाही वाहतूक कोंडीस सामोरे जावे लागते. दैनंदिन अतिक्रमण निर्मूलन कारवाई केल्याचा आव आणला जातो. प्रत्यक्षात, मात्र अतिक्रमण निर्मूलन पथकास येथील ना फेरीवाला क्षेत्राखालील अनधिकृत व्यवसाय कसे दिसून येत नाही. असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. त्यामुळे अतिक्रमण पथकाने संबंधित क्षेत्र अतिक्रमण मुक्त करण्यात यावा. अशी मागणी स्थानिक नागरिक करत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satana News : दुष्काळ जाहीर; मात्र शेतकरी डिजिटल चक्रव्यूहात, सातबारा अन् ‘फार्मर आयडी’साठी संकेतस्थळे ठप्प

SME Growth Fund : लघु आणि मध्यम उद्योगांसाठी १० हजार कोटींचा 'एसएमई ग्रोथ फंड'; केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

Marathi News Live Updates: पुनर्विकासाचे सर्वाधिक प्रकल्प कोथरूडमध्ये ‘द रीडेव्हलपमेंट पल्स’चा अहवाल

Sanchar Saathi Milestone : सायबर फसवणुकीविरोधात नागरिक बनले ‘योद्धा’! ‘संचार साथी’ पोर्टलने ओलांडला ३० कोटी भेटींचा टप्पा

Mumbai Police: 2 हजार 850 बनावट अ‍ॅप्स अन् 9 हजार 673 नागरिकांची 150 कोटींची फसवणूक; मुंबई पोलिसांनी केला पर्दाफाश

SCROLL FOR NEXT