Sandeep Gare while giving a statement to the officers of the Niphad Panchayat Committee office esakal
नाशिक

Nashik : खानगावला शाळेसमोरच अनधिकृत बांधकाम सुरू; प्रशासनाची टोलवाटोलवी

सकाळ वृत्तसेवा

नैताळे (जि. नाशिक) : खानगाव (नजीक) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेसमोर अनधिकृत बांधकाम सुरू असल्याची तक्रार वनसगाव विकास सोसायटीचे माजी अध्यक्ष संदीप गारे यांनी निफाडचे तहसीलदार शरद घोरपडे व गटविकास अधिकारी संदीप कराड यांच्याकडे करण्यात आली आहे.

वनसगाव- लासलगाव रस्त्यावर खानगाव (नजीक) हे गाव असून जिल्हा परिषदेचे अंतर्गत प्राथमिक विद्यामंदिर ही शाळा आहेत. या शाळेसहीत मोठी जागा ग्रामपंचायत गावठाण म्हणून उल्लेख असलेली जागा आहेत. तसा सातबारा उताराही ग्रामपंचायतीच्या नावाने आहे. प्राथमिक विद्यामंदिर या शाळेच्या बिलकुलसमोर काही व्यक्तींनी अनधिकृत बांधकाम सुरू केले आहे. (Unauthorized construction started in front of school in Khangaon Nashik Latest Marathi News)

शासकीय अधिकारी म्हणून ग्रामसेवकांना याबाबत सांगितले, मात्र ग्रामपंचायत व्यवस्थापन त्याकडे डोळेझाक करत आहेत. असे लक्षात आल्याने याबाबतची तक्रार निफाडचे तहसीलदार शरद घोरपडे यांच्याकडे करण्यात आली. त्यांनी हा विषय गटविकास अधिकारी यांच्याअंतर्गत असल्याचे सांगून चेंडू गटविकास अधिकाऱ्यांच्या दालनात टोलविला. गटविकास अधिकारींनाही निवेदन देण्यात आले आहे. हा विषय शैक्षणिक संदर्भात असल्याने अधिकाऱ्यांनीही तातडीने दखल घ्यावी अशी मागणी करण्यात आली आहे.

"शाळेच्या समोर होत असलेले अतिक्रमन व अन्अधिकृत बाधकाम ग्रामपंचायत व्यावस्थापनानेच थांबवायला हवे हा विषय शैक्षणिक संदर्भात आहेत कोणालाही तकलीब देण्याचा माझा हेतू नाही माय- बाप अधिकाऱ्यांनी हे थांबवा अन्यथा शाळेची व विद्यार्थ्यांच्या नुकसान टाळण्यासाठी मला उपोषन करावे लागेल." - संदिप गारे, माजी अध्यक्ष - वनसगाव सोसायटी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

Kasba Ganpati Pune: पुण्यातल्या कसबा गणपती मंडळाकडून दिलगिरी व्यक्त; विसर्जन मिरवणुकीला १३४ वर्षांत पहिल्यांदाच उशीर

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

Nepal PM: संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात नेपाळच्या पंतप्रधानांची जागतिक व्यवस्थेवर जोरदार टीका; भारताचाही उल्लेख

PM Kisan 24th Installment : पीएम किसानच्या २४व्या हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळणार? शेतकऱ्यांना प्रतीक्षा; दसऱ्यापूर्वी खात्यात जमा होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT