Murder Case esakal
नाशिक

Nashik Crime: भाच्याने ढकलल्याने मामाचा मृत्यू; सदोष मनुष्यवधाचा गुन्हा, संशयित ताब्यात

सकाळ वृत्तसेवा

पंचवटी : पंचवटी, हिरावाडीतील वाल्मीक आवास योजनेतील मामा-भाच्याच्या भांडणात शुक्रवारी (ता. १५) भाच्याने मामाला धक्काबुक्की करत पलंगावरून लोटून दिले होते. यात मामाच्या डोक्यास गंभीर मार लागून उपचारास नेतानाच त्यांचा मृत्यू झाला होता.

शनिवारी (ता. १६) पंचवटी पोलिसांत प्रथम अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मात्र, शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतर संशयित भाच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला असून, संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे. (Uncle dies after being pushed by nephew Crime of culpable homicide suspect in custody Nashik Crime)

इंदूबाई खाणे (रा. साक्री, धुळे) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, संशयित मच्छिंद्र सुखदेव मानभाव (वय २७, रा. हिरावाडी) हा दोन महिन्यांपासून मामा बाबूलाल सोमा गावित यांच्याकडे राहात होता.

बाबूलाल गावित हे दोन दिवसांपासून भाचा मच्छिंद्र मानभाव यास, ‘मुलाला चटके लागले, त्याला दवाखान्यात नेण्यास पैसे नाही; पण दारू पिण्याकरिता पैसे आहे, असे बोलल्याचा राग आल्याने संशयित मच्छिंद्र याने मामा बाबूलाल यांना पलंगावरून पाडले.

झाडाची कुंडी छातीवर फेकून मारली. बाबूलाल यांना मार लागल्याने ते बेशुद्ध पडले. गायकवाड आणि नातेवाइकांनी त्यांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.

पंचवटी पोलिस ठाण्यात प्रथम अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. रात्री उशिरा सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला. संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे. वरिष्ठ निरीक्षक अनिल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जगातला सगळ्यात मोठा डॉन; 'मुळशी पॅटर्न'प्रमाणेच बकासूर झाला अन् अमेरिकेच्या जेलमध्ये तडफडून मेला

Lawyer Rakesh Kishor: मोठी बातमी! सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलावर कारवाई; बार कौन्सिलने घेतला मोठा निर्णय

Latest Marathi News Live Update : खासदर शोभाताई बच्छाव यांचा पाचोरा तालुक्यातील पाहणी दौरा पूर्ण

Akola News : आरक्षण जाहीर! कुठे धक्का तर कुठे मिळाली संधी; जिल्ह्यातील पाच नगराध्यक्ष पदांवर महिलाराज

Kannad Nagarparishad Election : कन्नड नगराध्यक्षपद सर्वसाधारण महिलांसाठी राखीव; शहरात ‘भावी वहिनीसाहेब’ ताईसाहेब चर्चेत

SCROLL FOR NEXT